शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FIFA World Cup 2022: १०६२५ कोटींचा इंग्लंडचा संघ: जाणून घ्या मेस्सी, रोनाल्डो यांच्या संघांची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 3:24 PM

1 / 6
Most expensive squad in the FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा दुसऱ्या आठवड्यात आली आहे आणि दिवसेंदिवस या स्पर्धेतील थरार रंगत चाललेला आहे. जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून फुटबॉल वर्ल्ड कप ओळखला जातो आणि त्याला कारणही तितकेच आहे. विजेत्यांवर होणारा बक्षीसांचा वर्षाव, खेळाडूंना मिळणारे कोट्यवधी रुपये, असा पैशांचा पाऊस पडणार आहे.
2 / 6
अर्जेंटिना आणि जर्मनी या माजी वर्ल्ड कप विजेत्यांना तुलनेने दुबळ्या संघांकडून हार मानावी लागली होती, परंतु त्यांनी पुढील सामन्यात पुनरागमन करताना स्पर्धेतील आव्हान कायम राखले. इंग्लंडने पहिल्याच सामन्यात ६-२ असा दणदणीत विजय मिळवला, परंतु नंतर त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला.
3 / 6
कतार मध्ये होणारी ही स्पर्धा ही आतापर्यंतची सर्वात महागडी वर्ल्ड कप स्पर्धा असल्याचा दावा केला जातोय. त्यात सहभागी ३२ संघांमध्ये सर्वात महागडा संघ इंग्लंडचा आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंना विविध लीगमध्ये मिळणाऱ्या ट्रान्सफर विंडोचा हिशोब केला, तर इंग्लंडच्या संघाची किंमत ही १०६२५ कोटी ७८ लाख ६४, ३२२ इतकी होतेय.
4 / 6
जगातील दोन दिग्गज फुटबॉलपटू जे इंस्टाग्रामच्या एका पोस्टला सर्वाधिक पैसे कमावणारे ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांचे संघ मात्र या क्रमांकावर कितव्या स्थानी आहेत ते पाहा. ब्राझील ९३३० कोटी ६६ लाख १२,१३१ आणि फ्रान्सचा ८१८४ कोटी ७९ लाख ०५, ३७८ हे दोन संघ अव्वल तिघांत आहेत.
5 / 6
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगालच्या संघाची किंमत ७६६९ कोटी १४ लाख ८७, ३३९ इतकी आहे. स्पेनची ७३८२ कोटी ६८ लाख, १०, ६५१ कोटी आणि जर्मनीची ७२५१ कोटी, ७२ लाख ४४,१६५ इतकी किंमत आहे.
6 / 6
लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाची किंमत ५१८० कोटी ९७ लाख २४,१०४ इतकी आहे आणि तो सातव्या क्रमांकावर आहे. नेदरलँड्स ( ५८७ मिलियन युरो), बेल्जियम ( ५६३ मिलियन युरो), उरुग्वे ( ४५० मिलियन युरो), क्रोएशिया ( ३७७ मिलियन युरो ) आणि सर्बिया ( ३६० मिलियन युरो) अशी क्रमवारी आहे.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सीEnglandइंग्लंड