शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lionel Messi Luxurious Lifestyle: लिओनेल मेस्सीची रॉयल 'लाइफ स्टाइल', वेगवेगळ्या देशात आहेत २३४ कोटींची आलिशान घरं! पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:06 PM

1 / 8
अर्जेंटिनाच्या टीमचा कर्णधार आणि सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या जादुई खेळाचा सध्या फुटबॉल चाहते मनसोक्त आनंद घेत आहेत. मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेटिंनाचं संघ वर्ल्डकप २०२२ च्या फायनलमध्ये पोहेचला आहे.
2 / 8
३५ वर्षीय मेस्सीनं याआधीच स्पष्ट केलं आहे की हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे आपल्या करिअरमध्ये पहिल्या वर्ल्डकप विजयाची आशा मेस्सीसह संपूर्ण अर्जेंटिनाच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. असं झाल्यास मेस्सीच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आणि अर्जेंटिना संघाच्या आजवरच्या कारकिर्दीतील तिसरा वर्ल्डकप विजय ठरेल. मेस्सीनं आतापर्यंत स्पर्धेत ५ गोल केले आहेत.
3 / 8
वर्ल्डकपमध्ये गोल्डन शूजच्या शर्यतीत मेस्सी तगडा दावेदार आहे. मेस्सी जसा ऑनफिल्ड राजा आहे. तसंच मैदानाबाहेरही मेस्सी रॉयल लाइफस्टाइल जगतो. जगातील विविध देशांमध्ये मेस्सीची २३ मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास २३४ कोटी रुपयांचे आलिशान बंगले आहेत.
4 / 8
गोल डॉट कॉमच्या माहितीनुसार मेस्सीची नेटवर्थ ४०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२६८ कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची कमाई १३० मिलियन डॉलर (जवळपास १०६२ कोटी रुपये) इतकी आहे.
5 / 8
जगात विविध देशांमध्ये एकूण चार ठिकाणी मेस्सीची आलिशान घरं आहेत. यात स्पेनजवळच्या इबिजा आयलँडवर असलेला आलिशान बंगला त्याच्या एकूण मालमत्तांपैकी सर्वाधिक महाग आहे. ज्याची किंमत ९.५ मिलियन डॉलर (९७ कोटी रुपये) इतकी आहे. मेस्सी आजही सुट्टीसाठी या आलिशान घराचा वापर करतो. रिपोर्ट्सनुसार अजूनही मेस्सीचं हे घर पूर्णपणे तयार झालेलं नाही.
6 / 8
मेस्सीजवळ ५.५ मिलियन पाऊंड (५६ कोटी रुपये) किमतीचा एक बंगला बार्सिलोनामध्येही आहे. या बंगल्याचं लोकेशनही खूप सुंदर आहे. जे कॅम्प नाऊ स्टेडियमपासून १२ किमी अंतरावर आहे. मेस्सीची पत्नी Antonella Roccuzzo आणि त्यांच्या तीन मुलांचं हे आवडीचं घर आहे. यात एक छोटं फुटबॉल ग्राऊंडही आहे. तसंच एक स्विमिंग पूल, एक इनडोअर जिम तसंच खेळाचं मैदान देखील आहे.
7 / 8
अमेरिकेच्या मियामी येथेही मेस्सीचं घर आहे. ज्याची किंमत ५ मिलियन डॉलर (५१ कोटी रुपये) इतकी आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर व्ह्यू दिसतो. या अपार्टमेंटमध्ये ४ बेडरुम आणि ४ बाथरुम आहेत.
8 / 8
मेस्सीनं अर्जेंटिनामध्येही एक घर आहे. रोसारियो स्थित या बंगल्याची किंमत ३ मिलियन पाऊंड (३१ कोटी रुपये) इतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार या घरात २० ते २५ खोल्यात आहेत. यात एक सिनेमा हॉल देखील आहे. एक जिम, अंडरग्राऊंड गॅरेज देखील आहे. ज्यात एकावेळी १५ कार पार्क होऊ शकतात.
टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२