Lionel Messi's Used Tissue From Barcelona Farewell Speech Goes On Sale; Check Out Price
लिओनेल मेस्सीनं डोळे पुसले त्या 'टिशू पेपर'ला भारी डिमांड; कारण अन् किंमत जाणून बसेल धक्का! By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 2:32 PM1 / 8बार्सिलोना क्लबसोबतच्या निरोपाच्या सोहळ्यात लिओनेल मेस्सी ढसाढसा रडला. २००० साली वयाच्या १६ वर्षी बार्सिलोना क्लबकडून लिओनेल मेस्सीनं पदार्पण केलं. २१ वर्षांनंतर त्यानं क्लब सोडण्याचा निर्णय घेतला अन् निरोपाच्या भाषणात त्याला रडताना पाहून चाहतेही हळहळले...2 / 8मेस्सीनं बार्सिलोनाकडून ७७८ सामन्यांत ६७२ गोल्स करून दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा एकाच क्लबकडून सर्वाधिक ( ६४३ गोल्स, सँटोस क्लब) गोल्स करण्याचा विक्रम मोडला. ला लिगा स्पर्धेच्या ८ हंगामात व चॅम्पियन्स लीगच्या ६ हंगामात सर्वाधिक गोल्सचा विक्रम केला. 3 / 8मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain ) क्लबकडून खेळताना दिसेल आणि दोन वर्षांच्या करारासाठी त्याल बक्कळ पैसाही दिला जाणार आहे. PSG सोबत त्यानं ३०० कोटींचा करार केला आहे. 4 / 8चार चॅम्पियन्स लीग, १० ला लिगा यासह ३४ प्रमुख स्पर्धा जिंकण्याचा विक्रमही त्यानं बार्सिलोनाकडून केला अन् सलग चार असे एकूण सहा बॅलोन डी ओर पुरस्कारही त्याने जिंकले.5 / 8त्यामुळेच निरोपाच्या सोहळ्यात मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू पाहून चाहत्यांनी व मीडिया सदस्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. निरोपाच्या भाषणात मेस्सीचे अश्रू थांबतच नव्हते आणि पत्नी एंटोनेला हिनं त्याला डोळे पुसण्यासाठी टिशू पेपर दिला.6 / 8आता हाच टिशू पेपर ७.४३ कोटींत विकला जात आहे. एका अज्ञात व्यक्तिनं दावा केला आहे की, मेस्सीनं वापरलेले टिशू पेपर त्यानं जमा केले आणि त्याच्या ऑनलाईन विक्रीसाठी जाहिरातही दिली आहे. 7 / 8मॅकेडूयो नावाची ही व्यक्ती मेस्सीनं वापरलेला टिशू पेपर विकत आहे. या टिशून मेस्सीचे जेनेटिक असल्याचा दावा त्यानं केला आहे आणि त्यातून मेस्सीचा क्लोन तायर केला जाऊ शकतो. 8 / 8मॅकेडूयो नावाची ही व्यक्ती मेस्सीनं वापरलेला टिशू पेपर विकत आहे. या टिशून मेस्सीचे जेनेटिक असल्याचा दावा त्यानं केला आहे आणि त्यातून मेस्सीचा क्लोन तायर केला जाऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications