शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 9:37 AM

1 / 10
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. दक्षता म्हणून अनेक देशांनी शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. जे विद्यार्थी शाळेच्याच पोषण आहारावर अवलंबून आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
2 / 10
अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्लंडचा फुटबॉलपटू मार्कस रॅशफोर्ड पुढे आला आहे. मँचेस्टर युनायटेड क्लबच्या या स्टार खेळाडूनं FareShare या स्वयंसेवी संस्थेसोबत शाळकरी मुलांना अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
3 / 10
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स येथील जवळपास १० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
4 / 10
पण, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर गरीब मुलांचे शाळेच्या पोषण आहारवर पोट होते, त्यांना भुकेलं रहावं लागत आहे. अशा मुलांना रशफोर्ड मदत करत आहे. कोरोना व्हायरसमुळे इंग्लिश प्रीमिअर लीगही रद्द करण्यात आली आहे.
5 / 10
इपीएल रद्द असल्यामुळे रशफोर्डनं फावला वेळ समाजकार्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे. त्यानं FareShare या संस्थेसोबत लंडनमधील ३२ हजार शाळांना अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला.
6 / 10
'' अन्न मिळतं म्हणून अनेक जणं शाळेत येतात. पण, आता शाळाच बंद असल्यानं त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी मी गेले काही दिवस या संस्थेशी चर्चा केली आणि हा प्रश्न कसा सोडवता येईल, यावर पर्याय शोधले,''असं रशफोर्डनं सांगितले.
7 / 10
''मला या समस्येची तीव्रता जाणून घ्यायची होती आणि या मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल, याची माहिती घ्यायची होती. त्यामुळे आपल्याला अन्न कधी व कसं मिळेल, याची चिंता मुलांनी करू नये,'' असंही तो म्हणाला.
8 / 10
त्यानं पुढे सांगितले की,'' FareShareUK ही संस्था लंडनमधील ११ हजार विविध संस्थांना अन्न पोहोचवते आणि ते जवळपास १ लाख लोकांना दिले जाते. अशा संस्थेसोबत काम करताना मला आनंद होत आहे. आमचं एकच लक्ष्य आहे, की कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये.''
9 / 10
सोशल मीडियावर रशफोर्डचे २४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्यानं या स्तुत्य उपक्रमात चाहत्यांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.
10 / 10
२० मुलांना अन्न पुरवण्यासाठी प्रत्येकानं ५ पाऊंडची मदत करावी, असं आवाहन त्यानं केलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडFootballफुटबॉलSchoolशाळा