अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 10:01 IST
1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत आणि क्रीडापटूंना घरीच रहावे लागत आहे.2 / 10अशा तणावाच्या वातावरणात एका नव्या प्रेम प्रकरणाची बातमी समोर येत आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या खेळाडूशी संबंधित हे प्रकरण असल्यानं सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.3 / 10पण, ही लव्हस्टोरी त्या फुटबॉलपटूची नसून त्याच्या आईची आहे. 52 वर्षीय नॅडीने गोंसाल्व्हेसनं दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.4 / 10नॅडीने ज्याच्या प्रेमात पडली आहे, तो तिच्या मुलाचा जबरा फॅन आहे आणि त्याचं वय अवघे 22 वर्ष आहे. या दोघांनी एक रोमँटीक पोझमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून प्रेमाची कबुली दिली आहे.5 / 10टिएगो रॅमोस असे या प्रेमवीराचे नाव असून तो सुपरस्टार फुटबॉलपेक्षाही सहा वर्षांनी लहान आहे. म्हणजेच नॅडीनेचा बॉयफ्रेंड हा तिच्या मुलाच्या वयापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे.6 / 10आता हा सुपरस्टार फुटबॉलपटू कोण आणि त्याची या प्रकरणावरील रिअॅक्शन काय, याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल.7 / 10ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार याची आई प्रेमात पडली आहे. नॅडीनेनं इंस्टाग्रामवर तिचा आणि टिएगोचा फोटो पोस्ट करून हे जाहीर केले. तिनं लिहीले की,''हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.''8 / 10नॅडीनेनं 2016मध्ये नेयमारचे वडिल वॅगनर रिबेरो यांच्यासोबतचा 25 वर्षांचा संसार मोडला. 9 / 10नेयमारला आईच्या नव्या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यानं लिहीले की,''आई आनंदी राहा, खुप खुप प्रेम.''10 / 10रिबेरो यांनीही या नव्या कपलला शुभेच्छा दिल्या.