Know, the journey from Pramod Sawant's doctor to Chief Minister
जाणून घ्या, प्रमोद सावंत यांचा डॉक्टरपासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:37 PM1 / 8भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 2 / 8गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. 3 / 8सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. 4 / 8तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा या रसायनशास्त्राच्या शिक्षिका आहेत. त्या बीकोलीममधल्या श्रीशांतादुर्गा सेकंडरी स्कूलमध्ये शिकवतात. 5 / 8. तसेच गोव्यातील भाजपा महिला मोर्चाच्या त्या अध्यक्षा आहेत. प्रमोद सावंत हे पर्रीकरांचेही अत्यंत विश्वासू होते. 6 / 8पर्रीकरांना एखाद्या सरकारी कार्यक्रमाला जाणं शक्य नसल्यास ते प्रमोद सावंत यांना पाठवत असत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. 7 / 8पहिल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही; मात्र नंतर ते पाळी (आताच्या साखळी) मतदारसंघातून निवडून आले. 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या प्रमोद यांनी कोल्हापुरातून आयुर्वेदातील पदवी घेतली. काही काळ त्यांनी उसगाव येथे दवाखानाही चालवला होता. 8 / 8ते समाजसेवेसाठी संस्थाही त्याकाळी चालवत होते व आजही चालवतात. समाजसेवेतील पदव्युत्तर पदवीही त्यांनी पुणे विद्यापीठातून मिळवली आहे. मृदुभाषी पण कर्तव्यकठोर म्हणून ते ओळखले जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications