गोव्यात कामगारांच्या देशव्यापी बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:47 IST
1 / 10विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला गोव्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.2 / 10खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड झाली. 3 / 10कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणल्या होत्या परंतु त्या अपुºया पडल्या. लोकांना कदंब बसगाड्यांची तासन्तास वाट पहावी लागत होती. 4 / 10राजधानीतील बस स्थानकावर सकाळी एक दोन खाजगी बसेस आल्या.5 / 10खाजगी बसेस नंतर बंद ठेवण्यात आल्या.6 / 10रिक्षा, मोटरसायकल पायलटांनी व्यवसाय चालू ठेवला त्यामुळे त्यांची बरीच कमाई झाली. 7 / 10बाजारपेठा चालू होत्या परंतु लोकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने दुकानांमध्ये ग्राहक नव्हते. डिचोलीत बुधवारी आठवड्याच्या बाजारावरही परिणाम झाला. 8 / 10चोडण आणि दिवाडी येथील फेरीबोटी सकाळी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.9 / 10बस स्थानकांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.10 / 10सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्तरावर दहा कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती.