शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोबेल विज्ञान प्रदर्शनाची पणजीत जय्यत तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 11:23 PM

1 / 5
येत्या गुरुवारपासून पणजीत (दि. 1 फेब्रुवारी) सुरू होणा-या दुस-या ‘नोबेल प्राईज सिरीज’ या कार्यक्रमाची तयारी वेगाने सुरू आहे.
2 / 5
विज्ञान प्रदर्शनासाठी कला अकादमीच्या दर्यासंगमावर खास वातानुकूलित शामियाना उभारण्यात आला आहे.
3 / 5
या शामियान्यात स्वीडनसह अन्य देशातील तंत्रज्ञ विज्ञान प्रदर्शनाची तयारी करीत आहेत.
4 / 5
जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून पाहिले गेलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांचे 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी या काळात गोव्यात वास्तव्य राहणार आहे.
5 / 5
या खास शामियान्यात तारांगणासारखी सजावट केली जात आहे. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
टॅग्स :goaगोवा