10 things to overcome bad mood
नैराश्येतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी 'या' 10 टिप्स करतील मदत By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 3:33 PM1 / 11आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक चढ-उतार येतात. अशातच सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो. अशातच नोकरदार माणसांना अशा समस्यांता सतत सामना करावा लागतो. अनेकदा तर पदरी निराशाही येते. अशातच तणावातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा मूड फ्रेश ठेवणं आवश्यक असतं. आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला नैराश्य दूर करून उत्साही राहण्यास मदत होते. 2 / 11अनेकदा खराब मूडमुळे काम करण्याची इच्छा मरून जाते. नैराश्येतून बाहेर पडून आपल्या कामाला प्राधान्य देणं आवश्यक असतं. इतर गोष्टींकडे दुर्लक्षं करून स्वतःचं काम मनापासून करा. 3 / 11अनेकदा कामाचा ताण किंवा थकवा यांमुळे उदास वाटतं. अशावेळी दीर्घ श्वास घेणं फायदेशीर ठरतं. असं करणं मेडिटेशन्सचाच एक भाग असून असं केल्याने मानसिक आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. 4 / 11अनेकदा कामाचा ताण किंवा ऑफिसमधील भांडणं यांमुळे प्रचंड ताण जाणवतो. प्रचंड चिडचिड होत असते. यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही एखादा चित्रपट किंवा विनोदी कार्यक्रम पाहू शकता. 5 / 11अनेकदा काही शुल्लक कारणांमुळे मूड खराब होतो. त्यावेळी त्या घटनेसोबतच इतरही नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. यामुळे तुमचं मन अस्थिर होऊ शकतं. अशावेळी तठस्थ होऊन नकारात्मक विचार थांबवण्याचा प्रयत्न करा.6 / 11अनेकदा आपल्या मूड खराब झाल्यानंतर एकटं राहावसं वाटतं. पण असं न करता. इतरांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करा. त्यांना मदत करा. 7 / 11छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा मूड ऑफ होणं यावर गाणी ऐकणं हा उत्तम उपाय ठरतो. अनेक संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, म्युझिक तणाव किंवा डिप्रेशनवर फायदेशीर ठरतं. त्यामुळे गाणी ऐकल्यामुळे मनासिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. 8 / 11तणावात असाल तर चिंता सोडा आणि तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थांचं सेवन करा. यामुळेही तणाव दूर होण्यास मदत होते. 9 / 11तणावात असाल तर व्यायाम करा. व्यायाम केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होण्यासोबतच मानसिक स्थिती सुधारण्यासही मदत होते. 10 / 11डोक्यात खूप विचार येत असतील तर अजिबात टेन्शन घेऊ नका. शांत झोपून जा. टेन्शन दूर होऊन तणाव दूर होण्यास मदत होते. 11 / 11तणावामध्ये फार चिडचिड होते. अनेकदा ही चिडचिड कारणामुळे असते तर अनेकदा कारणाशिवाय असते. आणखी वाचा Subscribe to Notifications