शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : धोका वाढला कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिसताहेत 'हे' 3 मोठे बदल; लक्षणांमुळे पुन्हा चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 1:05 PM

1 / 20
देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
2 / 20
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे साडे सहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
3 / 20
मंगळवारी (14 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट 98.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. डेली पॉझिटिव्हिटी रेट 2.05 टक्के तर वीकली पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के झाला आहे.
4 / 20
सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. सामाजिक अंतर पाळा. कोरोनाशी लढण्याची क्षमता असूनही शरीराला त्याचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नियम पाळा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
5 / 20
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्सचे प्राध्यापक डॉ. सतीश कुमार म्हणतात की, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना व्हायरस हा असा आजार झाला आहे की, संसर्ग झाल्यानंतर शरीरातील जवळपास सर्व अवयव प्रभावित होऊ शकतात.
6 / 20
कोविड इफेक्टनंतर कोरोनामुळे हाडांनाही इजा झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यांच्यात काही लक्षणे बदलली आहेत. डॉ. सतीश सांगतात की, कोरोनाच्या नवीन रुग्णांवर बारकाईने नजर ठेवल्यानंतर 3 मोठे बदल दिसत आहेत.
7 / 20
पहिला बदल कोरोनाच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडमध्ये, म्हणजेच त्याच्या संसर्गाच्या कालावधीशी संबंधित आहे. दुसरा बदल कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या पूर्ण बरे होण्याबाबत आहे.
8 / 20
तिसरा बदल जो प्रत्येकामध्ये दिसत नाही, परंतु काही रुग्णांमध्ये घशात वेदना होत आहेत, काहींमध्ये या वेदना तीव्र स्वरुपाच्या आहेत. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये, कोणतीही लक्षणे नसल्यामुळे कोणताच बदल कमी दिसतो किंवा अजिबात दिसत नाही.
9 / 20
डॉ. सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता येणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांमध्ये पहिला बदल त्याच्या इन्‍क्‍यूबेशन पीरियडबाबत दिसत आहे. इन्‍क्‍यूबेशन पीरियड म्हणजेच कोरोना संक्रमित किंवा व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर किती दिवसांनी दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो.
10 / 20
दुसऱ्या आणि पहिल्या लाटेतील रुग्णांमध्ये असे दिसून आले होते की, जर एखादी व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आली तर 5-7 दिवसांत कोरोनाची लक्षणे त्याच्यात दिसू लागतात, परंतु आता त्याचा कालावधी काहीसा वाढलेला दिसत आहे.
11 / 20
काही रुग्णांमध्ये असे दिसून आले आहे की व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 8-10 दिवसांनी त्यांच्यामध्ये कोरोनाची पुष्टी होत आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, व्हायरस लोकांना संक्रमित करण्यासाठी अधिक मेहनत घेत आहे आणि त्यामुळेच कोरोनाचा इन्‍क्‍यूबेशन पीरियड वाढत आहे.
12 / 20
डॉ. सतीश सांगतात की, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात 14 दिवसांत रुग्ण बरा होत असे. कधीकधी हा कालावधी गंभीर रुग्णांमध्ये 14-21 दिवसांचा असतो. या कालावधीपर्यंत लोक या आजारातून बरे होत होते.
13 / 20
जरी आता कोरोनाचा संसर्ग हा खूप सौम्य किंवा लक्षणे नसलेला असला, तरी सुमारे 1 महिन्यापर्यंत रुग्णांमध्ये अशक्तपणा किंवा वेदना दिसून येत आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांच्या त्रासात घट होत असली तरी थकवा, वेदना ही लक्षणे जवळपास महिनाभर कायम असल्याचा अंदाज आहे.
14 / 20
पूर्णपणे निरोगी होण्यासाठी आणि तंदुरुस्त होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागत असल्याचे निरीक्षण आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
15 / 20
कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्येही घसा दुखण्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच घसा खवखवणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे अशी माहिती डॉ. सतीश यांनी दिली आहे.
16 / 20
आवाजात बदल होणे, घशात दुखणे किंवा जड होणे या रुग्णांसाठी समस्या होत्या, परंतु आता जे रुग्ण पुढे येत आहेत ते सांगतात की, त्यांना घशात कोणीतरी दाबून ठेवल्यासारखे किंवा गुदमरल्यासारखे वाटत आहे. बोलायलाही त्रास होतो असं काही रुग्णांचे म्हणणे आहे.
17 / 20
डॉ. सतीश म्हणतात की, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये, ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंचा संसर्ग सध्या आढळून येत आहे. इतकेच नाही तर रोज येणाऱ्या सर्व रुग्णांमध्येही अशीच लक्षणे आढळत नाहीत. काही लक्षणे नसलेली असतात, काहींना सौम्य लक्षणे असतात, तर काही रुग्णांना सौम्य गंभीर लक्षणे असतात.
18 / 20
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या खूपच कमी आहे. यामागे कोरोना संसर्गापासून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि लसीकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. तरी लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
19 / 20
सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. सामाजिक अंतर पाळा. कोरोनाशी लढण्याची क्षमता असूनही शरीराला त्याचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नियम पाळा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
20 / 20
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यातील कोरोना संक्रमणाचाही बैठकीत आढावा घेतला. कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे. कोविड नियमांचे पालनही करावे. मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याचीही जनजागृती लोकांमध्ये करायला हवी.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य