30 minutes of walking every day
दररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:04 PM1 / 6इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. 2 / 6अमेरिकन सायकोलॅाजिकल असोसिएशनने केलेल्या एका प्रयोगावरुन असे समोर आले की सकाळच्या वेळी चालल्याने दिवसभर लोकांचा मूड फ्रेश राहतो.3 / 6दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते.4 / 6चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.5 / 6नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.6 / 6दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असे संशोधनातून समोर आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications