शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थंडीत फाटलेल्या ओठांवर करा हे '4' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 3:43 PM

1 / 5
थंडीच्या मोसमात आपण सगळे एका समस्येला सामोरे जात असतो ते म्हणजे भेगा पडलेले ओठ. प्रवासात किंवा थंड हवेकडे जाताना ओठ झाकून कितीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरीही भेगा पडतात किंवा ओठ पांढरे पडतात. या काही घरगुती उपायांनी आपण आपले ओठ मऊ आणि आर्द्र राहतील.
2 / 5
१) मध हे उत्तम मॉयश्चरायझर असतं आणि त्यात चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते. तसंच त्यात उत्तम हिलींग पॉवर असते. आपण दिवसभर अधूनमधून ओठांना मध लावल्यास ओठ मऊ होतात. तसंच मध आणि ग्लिसरीन यांचं मिश्रण करुन ते रात्री झोपण्याआधी ओठांना लावावं. सकाळी ओठ पाहून तुम्हीही खुश व्हाल.
3 / 5
२) खोबरेल तेल हे उत्तम नैसर्गिक मॉयशच्युरायझर आहे. थंड किंवा कोरड्या वातावरणामुळे फाटलेले ओठ मऊ करायला त्याची मदत होते. दिवसभरातून जमेल तसं ओठावर खोबरेल तेल लावत राहावं. त्याने ओठांचा मऊपणा आणि आर्द्रता कायम राहते. याऐवजी आलिव्ह ऑईल किंवा कॅस्टर ऑईलसुध्दा वापरु शकतो.
4 / 5
३) दुधावरची मलई किंवा साय ही सुक्या आणि फाटलेल्या ओठांवर उत्तम घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्यापुर्वी ओठाला साधारण तापमान असलेली साय लावावी. किंवा १० मिनिटं ठेवून नंतर कोमट पाण्यात कापूस भिजवून हलक्या हाताने ओठ स्वच्छ करावेत. याने ओठ मुलायम होतात.
5 / 5
४) बाल्कनीतलं गुलाबाचं रोपटंही तुमच्या ओठांना ओलावा आणि मऊपणा देऊ शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेले घटक तुमचे ओठ सुंदर दिसायलाही मदत करतं. राठ ओठांना गुलाबपाणी लावणंही चांगलं आणि फायद्याचं असतं.
टॅग्स :Healthआरोग्यBeauty Tipsब्यूटी टिप्स