शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Piles : पाइल्सवर रामबाण उपाय आहे घरातील हळद, लगेच आरामासाठी असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 2:29 PM

1 / 8
मायो क्लीनिकनुसार, पाइल्स प्रायव्हेट पार्टमध्ये होणारी एक गंभीर समस्या आहे. जी प्रत्येक चारपैकी तीन व्यक्तींना वेळोवेळी होत असते. यात मलाशयाच्या मार्गात नसांमध्ये सूज निर्माण होते. पाइल्स मलाशय किंवा विष्ठेच्या मार्गातील आजूबाजूच्या त्वचेमध्ये होतो. यात असह्य वेदना होतात आणि रक्तही वाहतं. ज्यामुळे व्यक्तीचं चालणं-फिरणं, बसणं-उठणं बंद होतं.
2 / 8
तज्ज्ञ सांगतात की, पाइल्स होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण त्यांची ठोस माहिती मिळू शकत नाही. पण याचं मुख्य कारण तुमची लाइफस्टाईल आणि तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी हेच आहे. सामान्यपणे पाइल्स काही दिवसात आपोआप बरा होतो, पण काही लोकांमध्ये ही समस्या जास्त काळ राहते. इतकंच काय तर काही लोकांमध्ये सर्जरी करण्याचीही वेळ येते. पाइल्सच्या उपचारासाठी अनेक पर्याय आहेत. तेच काही घरगुती उपायही आहेत.
3 / 8
काही लोक पाइल्सची समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर करण्याचा सल्ला देतात. हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण असतात हे सर्वांनाच माहीत आहे. हेच गुण पाइल्सच्या समस्येपासून आराम देतात. पण त्याआधी पाइल्सच्या समस्येवर हळदीचा वापर कसा करायचा हे जाणून घेतलं पाहिजे.
4 / 8
हळदीचे औषधी गुण - हळदीमध्ये अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी ट्यूमर, अ‍ॅंटी सेप्टीक, अ‍ॅंटी व्हायरल, अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी बायोटिक आणि अ‍ॅंटी कार्सिनोजेनिकसारखे औषधीय गुण असतात. हळदीवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, याने पचन चांगलं होण्यासोबतच पाइल्सची समस्याही दूर होऊ शकते.
5 / 8
हळद आणि अ‍ॅलोवेरा - एक चमचा हळदीसोबत अर्धा चमचा अ‍ॅलोवेराचा मिक्स करून मलाशयातील जखमेवर लावा किंवा याचं मिश्रण केलेलं पाणी प्यायल्याने पाइल्स लवकर बरा होतो. अ‍ॅलोवेरापासून तयार जेल जखमेवर लावलं तर आराम मिळतो. त्यामुळे याचा वापर हळदीसोबत करून तुम्हाला पाइल्सपासून लगेच सुटका मिळू शकते.
6 / 8
हळद आणि खोबऱ्याचं तेल - एक चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार खोबऱ्याचं तेल घेऊन मिश्रण तयार करा. हे मिश्रण मलाशयातील जखमेवर लावा. काही तास तसंच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. खोबऱ्याच्या तेलात एनाल्सेजिक आणि अॅंटी इन्फ्लेमेटरी प्रभाव असतात. जे हळदीसोबत मिश्रित करून जखमेवर लावले तर आराम मिळतो.
7 / 8
हळद आणि खोबऱ्याचं तेल - एक चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार खोबऱ्याचं तेल घेऊन मिश्रण तयार करा. हे मिश्रण मलाशयातील जखमेवर लावा. काही तास तसंच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. खोबऱ्याच्या तेलात एनाल्सेजिक आणि अॅंटी इन्फ्लेमेटरी प्रभाव असतात. जे हळदीसोबत मिश्रित करून जखमेवर लावले तर आराम मिळतो.
8 / 8
हळद आणि मोहरीचं तेल - मोहरीचं तेल हळदीमध्ये मिक्स करून प्रभावित भागावर लावा याने रक्तस्त्राव रोखण्यास मदत मिळेल. हे हळद आणि मोहरीच्या तेलातील अॅंटी इंन्फ्लेमेटरी औषधी गुणमुळे होत असतं. तेच काही लोक हळद आणि मोहरीच्या तेलाला पाइल्सचा रामबाण उपाय मानतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य