5 foods bad for kidneys avoid to prevent chronic kidney disease
काम करणं बंद करेल तुमची किडनी, जर खाणं सोडलं नाहीत हे 5 पदार्थ! By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:05 PM1 / 7किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या क्रियेबाबतही तुम्ही ऐकलं असेलच. अशात तरीही तुम्ही किडनीच्या आरोग्याबाबत किती विचार करता? जर किडनीच्या आरोग्याबाबत विचार करत नसाल तर आजच सुरू करा. कारण तुमची खाणं-पिणं, दिनचर्या किडनीची समस्या आणि आजारांचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला डायबिटीस, हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर याने किडनीच्या आजारांचा धोका आणखी वाढतो.2 / 7किडनी काय करते? - किडनी मानवी शरीरातील योद्धा असतात. किडनी शरीरातील अतिरिक्त तरल पदार्थ आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच रक्त शुद्ध करण्याचं कामही किडनी करतात. तसेच रक्तातील पाणी, लवण आणि खनिज एका योग्य प्रमाणात ठेवण्याचं कामही किडनी करतात. अशात किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं ठरतं. काही पदार्थ खाल्ल्याने तुमच्या किडनी खराब होऊ शकतात. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ...3 / 7मेयोनिज - सलाद किंवा सॅंडविचसाठी तुम्हाला मेयोनिज खाणं आधी सोडलं पाहिजे. मेजोनिजच्या केवळ एक चमच्यात 103 कॅलरीज असतात. त्यासोबतच मेयमध्ये सामान्य सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतं. फॅट नसलेलं किंवा कमी कॅलरीच्या मेयोनिजची निवड करा. पण हेही बघा की, त्यात सोडिअम आणि शुगर तर जास्त नाही ना.4 / 7फ्रोझन पदार्थ - काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, फ्रोजन फूड आणि मायक्रोवेवमध्ये शिजलेले पदार्थ टाइप 2 डायबिटीस वाढवण्यात मदत करतात. कारण या पदार्थांमध्ये फॅट, शुगर किंवा सोडिअम भरपूर प्रमाणात असू शकतं. ताजे आणि पौष्टिक पदार्थ खाणं नेहमी चांगलं असतं. 5 / 7सोडा - सोड्यामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. सोबतच यात कोणतंही पोषण नसतं. याने तुमच्या आहारात अतिरिक्त कॅलरी जोडल्या जातात. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. रिसर्चमधून समोर आलं की, सोड्याचं सेवन ऑस्टियोपोरोसिस, किडनीचे आजार, खराब पचनक्रिया आणि दातांच्या समस्यांना निमंत्रण देतो. 6 / 7प्रोसेस़्ड मीट - बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि बर्गर पॅटीजसारखे प्रोसेस्ड मीट तुमच्या किडनीचं आरोग्य खराब करू शकतात. यात हाय सोडिअम असतं. नियमितपणे अतिरिक्त सोडिअमचं सेवन केलं तर ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. काही रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, जास्त पशु प्रोटीनचं सेवन केल्याने किडनीचा आजाराचा धोका वाढतो.7 / 7डीप फ्राय पोटॅटो - जर तुम्ही फ्रेंच फ्राइजच्या रूपात चिप्ससारखे पॅकेज्ड फूड किंवा फास्ट फूडच्या रूपात बटाट्याचं सेवन करत असाल तर तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात आहे. किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर डीप-फ्राइड बटाटे खाणं टाळलं पाहिजे. बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. जे कमी करण्याचा सल्ला दिला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications