शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लेमन टी पिण्याचे 6 फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 5:04 PM

1 / 7
अनेकजण आरोग्य निरोगी राखण्यासाठी लेमन टी पितात. लेमन टी मुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहून तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते व तुम्ही दिवसभर तजेलदार दिसता. याशिवाय, लेमन टी प्यायल्याने आणखी कोणकोणते फायदे होतात, हे आपण पाहुया.
2 / 7
१) पचनसंस्थेचं शुद्धीकरण - लेमन टी प्यायल्याने पचनसंस्थेचं शुद्धीकरण होतं. लेमन टी मुळे शरीरातील टॅाक्सिन्स शरीराबाहेर पडतात. त्यामुळे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. त्यामुळे पोटदुखी अथवा आतड्यांचे विकार असणाऱ्यांसाठी लेमन टी उपयुक्त असते.
3 / 7
२) सर्दी आणि तापासाठी उपयुक्त - लेमन टीमध्ये आलं टाकून दिवसातून ३-४ वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. तसंच घशाची खवखव किंवा खोकला बरा करण्यासाठीही लेमन टीचा उपयोग होतो. लेमन टीमध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत.
4 / 7
३) मानसिक स्थैर्यासाठी - लेमन टीमुळे पोट साफ राहतं. जीवनशैलीतील ताणतणावामुळे आपल्या शरीरात टॅाक्सिन्स वाढतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी लेमन टी प्यायल्याने ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.
5 / 7
४) शरीरातील साखरेवर नियंत्रण - शरीरात इन्सुलिन्सचं प्रमाण वाढल्याने ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो. त्यामुळे दिवसातून ३-४ वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते व कोलेस्टरॉल कमी होते.
6 / 7
५) चेहरा टवटवीत दिसण्यासाठी - लेमन टीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरूमे आणि काळे डाग कमी व्हायला मदत होते. लेमन टीमध्ये मध आणि साखर मिश्रित करून दररोज प्यायल्याने चेहरा तजेलदार दिसतो.
7 / 7
६)वजन कमी करण्यासाठी - व्यायामासोबत योग्य आहार ठेवला तरच वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी राहण्यास मदत होते. तसंच भुकेचंही प्रमाण नियंत्रित राहतं.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स