शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सकाळी लसणाच्या दोन कच्च्या कळ्या खाऊन प्या कोमट पाणी, या 6 गंभीर समस्या लगेच होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:39 AM

1 / 10
लसूण (Garlic) हा प्रत्येक घरातील किचनमध्ये मिळणारा कॉमन मसाला आहे. प्राचीन काळात लसणाचा वापर करून औषधे तयार केली जात होती. आजही लसणाचा औषध म्हणून अनेक आजारांसाठी वापर केला जातो. लसणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे यात आढळणारं तत्व एलिसिन आहे. यामुळे यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण आढळतात.
2 / 10
लसणाचा वापर अनेक भाज्या-पदार्थांमध्ये केला जातो. पण याचं फक्त पदार्थांचं टेस्ट वाढवणं इतकंच नाहीये. अनेक आजारावर नैसर्गिक उपचार म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता. जर लसणाच्या पोषक तत्वांबाबत सांगायचं तर 100 ग्रॅम लसणातून तुम्हाला साधारण 150 कॅलरी, 33 ग्रॅम कार्ब्स, 6.36 ग्रॅम प्रोटीन मिळतं. लसणात व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी6, फोलेट, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस, पोटॅशिअम, सोडिअम आणि झिंकही भरपूर प्रमाणात असतं.
3 / 10
लसणाचे फायदे - लसणाचं तुम्ही कोणत्याप्रकारे सेवन करू शकता. तुम्हाला फायदा होणारच. पण असं मानलं जातं की, सकाळी उठून तुम्ही जर कच्चा लसूण खाल्ला आणि त्यावरून कोमट पाणी प्याल तर याचा जास्त फायदा होतो. ते काय आहेत हे जाणून घेऊ...
4 / 10
ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं - सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ला तर हाय ब्लड प्रेशरची लक्षणेही कमी होऊ शकतात. याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. तुमच्या लिव्हरचं आणि मूत्राशयाचं कामही चांगलं होतं.
5 / 10
जुलाबावर बेस्ट उपाय - जर तुम्हाला जुलाबाची समस्या असेल तर यावर लसूण हा बेस्ट उपाय ठरू शकतो. लसूण तुमच्या नर्वस सिस्टीमसाठी चांगला असतो. त्याशिवाय लसणामुळे तुमची भूक उत्तेजित होते आणि पचनाची क्रियाही चांगली होते.
6 / 10
तणाव कमी होतो - लसूण तुमची तणावाची लेव्हल कमी करण्यास मदत करतो. लसणामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर हे तत्व असतं, जे ग्लूटाथियोनचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं. हा अॅंटी-ऑक्सिडेंट तणावाला कमी करण्याचं काम करतो.
7 / 10
कोलेस्ट्रॉल करतो कमी - लसणाचं नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरात नसा ब्लाक करणारा बॅड कोलेस्ट्रॉल मेणासारखा वितळून जाईल. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी याचं सेवन नक्की करावं. कोलेस्ट्रॉल वाढणं एक गंभीर समस्या आहे जी हृदयासाठी घातक ठरते. तुम्हाला याने हार्ट अटॅकही येऊ शकतो.
8 / 10
लिव्हर बनवतो मजबूत - लिव्हर मजबूत करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कच्चा लसूण खाल्ला पाहिजे. लिव्हर चांगलं राहिलं तर तुम्ही जास्त काळ फीट रहाल आणि जगाल. याने अनेक संक्रमणापासूनही तुम्हाला सुरक्षा मिळेल.
9 / 10
शरीर आतून करतं साफ - लसणात सल्फर भरपूर प्रमाणात असल्याने याने शरीराची आतून चांगली सफाई होते. लसूण रक्तातील लेडचं प्रमाण कमी करू शकतं. याने शरीरातील विषारी पदार्थ कमी होतात.
10 / 10
कसं करावं सेवन - एक्सपर्टने सांगितलं की,लसणाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी याचं भाजीसोबतच कच्चा सेवन करावं. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाच्या दोन कळ्या कच्च्या चावून खाव्यात. त्यावर थोडं कोमट पाणी प्यावं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य