6 health benefits of wet almonds
हे आहेत भिजवलेल्या बदामांचे ६ आरोग्यासाठी फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 6:16 PM1 / 6गरोदर स्त्रीने बदाम खाणं तिच्यासाठी फार चांगलं असतं. कारण गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यासाठी बदाम उपयुक्त ठरतात. तसंच ते भिजवलेले असल्याने तिला पचायलाही हलके असतात. त्यामुळे गर्भाच्या मेंदुची आणि मज्जासंस्थेची वाढ योग्यरित्या होते.2 / 6भिजवलेले बदाम खाल्याने पचनशक्ती सुरळीत राहते. भिजवलेल्या बदामांच्या सालींमध्ये असलेले एन्जाईम्स मानवी शरीरातील पचनाला मदत करतात. त्यामुळे शरीरातील मेद कमी होते.3 / 6उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना भिजवलेले बदाम फार उपयुक्त असतात. त्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. नियमितरित्या बदाम खाल्यास रक्तदाब नैसर्गिकपातळीवर राहतो.4 / 6शरीरातील कोलेस्ट्राल कमी करण्यासाठी बदामातील अँटीऑक्सिडंट्सची मदत होते. बदामामुळे ह्रदयावरील ताण कमी होतो आणि ह्रदयविकारापासून लांब राहण्यास मदत होते.5 / 6भिजवलेले बदाम खाल्याने शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. धकाधकीच्या जीवनपध्दतीमुळे शरीरात गुड कॉलेस्ट्रॉल कमी होऊन ह्दयविकाराची शक्यता वाढतेय. बदामामुळे ती शक्यता कमी होत जाते.6 / 6बदामात कॅलरीज कमी असल्याने त्याचा आहारात समावेश असावा. बदामामुळे पचन सुधारतं. बदामामुळे वारंवार लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण राहतं. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत बदाम खाणं उपयुक्त ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications