शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Belly Fat: पोटावरील चरबी कमी करून स्लिम होण्याचे 7 बेस्ट उपाय, एकदा कराच...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:47 AM

1 / 8
How To Lose Belly Fat Faster: तुम्हीही तुमच्या पोटावर वाढलेल्या चरबीमुळे हैराण आहात का? आजकाल जास्तीत जास्त लोक बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबीमुळे वैतागलेले आहेत. अनेक लोक ही चरबी दूर करण्यासाठी वेगवेगळी उपाय करतात. पण तरीही त्यांची ईच्छा काही पूर्ण होत नाही. अशात आम्ही तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्याचे काही उपाय सांगणार आहोत. पण हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
2 / 8
जिऱ्याचं पाणी - जिरे एक फेमस मसाला आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो. जिरे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठीही महत्वाचं मानलं जातं. तसेच याने पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. याने तुम्ही वजनही कमी करू शकता. त्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्यांचं एक ग्लास पाणी प्यावे.
3 / 8
कोमट पाण्यात लिंबाचा रस - हा सगळ्यात कॉमन आणि इफेक्टिव उपाय आहे जो पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वापरला जातो. लिंबू पाण्याचा हा उपाय पोटावरीलच चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. त्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाका, त्यात चिमुटभर मीठ टाका. त्यासोबतच त्यात एक चमचा मध टाका. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करा.
4 / 8
लसूण - तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण लसूण तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. तुम्ही लसणाची कळी कच्चीही खाऊ शकता किंवा लसूण उकडून त्याचं पाणीही पिऊ शकता. असं मानलं जातं की, लसणाने पोटावरील चरबीही कमी होते.
5 / 8
भरपूर पाणी प्या - जेवढं जमेल तेवढं जास्त पाणी प्या. उन्हाळ्यात आपलं शरीर लवकर डिहायड्रेट होतं आणि आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होऊ लागते. आपण पाण्याऐवजी अनहेल्दी पदार्थ खाणं सुरू करतो. जे वजन वाढवण्यासोबत आपल्याला आजारी करतात. अशात तुम्ही दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवं.
6 / 8
खोबऱ्याचं तेल - जर तुम्हाला खरंच पोटावरील चरबी कमी करायची असेल तर तुमचं खाण्याचं तेल बदला आणि त्याजागी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. खोबऱ्याचं तेल शरीरातील फॅट कमी करण्यास फार फायदेशीर ठरतं.
7 / 8
नॅच्युरल शुगरवर करा फोकस - आर्टिफिशियल स्वीटनर्सऐवजी तुम्ही नॅच्युरल शुगरचं सेवन करू शकता. काही फळं आणि ड्राई फ्रूट्स आहेत जे तुमची शुगरची क्रेविंग शांत करण्यास मदत करतात. तुम्ही यांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करू शकता.
8 / 8
काही जडीबुटींचं करा सेवन - काही जडीबुटी आहेत ज्यांचं सेवन करून तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. याने मेटाबॉलिज्म आणि फॅट बर्निंगचं काम केलं जातं. यात दालचीनी, आले, जिनसेंग, पुदीन्याचा समावेश आहे.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स