शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जोर लावूनही सकाळी साफ होत नाही पोट? पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, लगेच व्हाल हलके!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:31 AM

1 / 9
How To Clean Stomach Naturally: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. पोट साफ न होण्याची ही समस्या अनेकांना होत असते. ज्यामुळे दिवसभर पोट गच्च राहतं आणि चिडचिडही होते. पोट साफ न होण्याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पाणी कमी पिणे. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. ज्याद्वारे तुमचं पोटही साफ होईल आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतील.
2 / 9
कोमट पाणी आणि लिंबाचा रस पोट साफ करण्यासाठी एक चांगला उपाय मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे पचन तंत्र चांगलं ठेवतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने पोट साफ होईल आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होईल. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.
3 / 9
ओव्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि पचन तंत्र सुधारणारे गुण असतात. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. याने पोटातील जडपणा, गॅस, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतील.
4 / 9
आयुर्वेदात त्रिफळा चूर्ण पोटासंबंधी समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय मानलं जातं. यात आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन वनस्पतींचं मिश्रण असतं. ज्यामुळे पचन तंत्र मजूबत होतं आणि शरीर डिटॉक्स होतं. एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून याचं तुम्ही सेवन करू शकता किंवा सकाळी रिकाम्या पोटीही सेवन करू शकता.
5 / 9
इसबगोल एक नॅचरल फायबर आहे, जे पोट साफ करतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं. याचं तुम्ही कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत सेवन करू शकता. याचं सेवन तुम्ही रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी रिकाम्या पोटी करू शकता.
6 / 9
अ‍ॅप्पल व्हिनेगर पोटाची पीएच लेव्हल संतुलित करण्याचं आणि पचन तंत्र सुधारण्यास मदत करतं. एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करून सकाळी सेवन करू शकता. याने पोट लगेच सोफ होईल आणि मेटाबॉल्जिमही बूस्ट होईल.
7 / 9
मधात अनेक औषधी गुण असतात. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात जे पचन तंत्र साफ आणि हेल्दी ठेवतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता. याने पोट चांगलं साफ होईल.
8 / 9
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे पचनक्रिया सुधारतं. एक चमचा अळशीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करा. याने पोट होईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
9 / 9
पोट साफ करण्यासाठी हे नॅचरल उपाय फायदेशीर ठरतील. सोबतच भरपूर पाणी प्या, नियमित व्यायाम करा, पायी चाला आणि संतुलित आहार घ्या. जर पोट साफ होत नसेल तर हे उपाय केल्यावर लगेच आराम मिळेल.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य