9 tips to cool your body in summer api
गरमीत घामामुळे हैराण झालात का? या टिप्सने शरीरातील उष्णता झटपट पळवा दूर अन् म्हणा ठंडा ठंडा कूल कूल... By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:50 AM1 / 11एकीकडे कोरोनाने सगळे हैराण होऊन घरात बसले आहेत आणि दुसरीकडे सूर्य कमालीचा तापतो आहे. मे महिना जवळ येऊ लागल्याने उष्णता कमालीची वाढली आहे. घरात अडकून पडलेल्यांना गरमीने हैराण करून सोडलं आहे. घामाने अंद चिंब भिजत आहे, पण त्यावर काहीही करता येत नाहीये. (Image Credit : firstresponse.ae)2 / 11काही लोक स्वत:ला थंड ठेवण्यासाठी जास्त थंड पाणी पित आहेत तर काही लोक दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने आंघोळ करत आहेत. इतकं करूनही तुम्हाला गरम होत असेल तर आम्ही शरीरातून उष्णता बाहेर काढण्याचे काही खास उपाय सांगणार आहोत.3 / 11तळलेले पदार्थ कमी खावे - उन्हाळ्यात तळलेले किंवा भाजलेले पदार्थ कमी खावेत. जंक फूड किंवा तळलेले पदार्थ अधिक खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढतं आणि तुम्हाला जास्त गरम होऊ लागतं. त्यामुळे असे पदार्थ टाळावे. उन्हाळ्यात शाकाहारी आहार तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करू शकतो.4 / 11डाळिंबाचा रस - उन्हाळ्यात डाळिंबाचा रस तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतो. फक्त तुम्हाला इतकंच करावं लागेल की, डाळिंबाच्या रसात बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकून सेवन करा. याने शरीरातील उष्णता दूर होईल.5 / 11पाय पाण्यात ठेवा - उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणं सगळ्यांनाच आवडतं. पण पुन्हा पुन्हा थंड पाण्याने आंघोळ कराल तर तुम्हाला सर्दी होऊ शकते. त्यामुळे शरीरातील उष्णता काढण्यासाठी तुम्ही थंड पाण्यात 10 मिनिटे पाय ठेवून बसा. याने उष्णता दूर होईल.6 / 11खसखस देईल आराम - झोपण्याआधी थोडं खसखस सेवन केल्याने शरीरातील उष्णात दूर होऊ शकते. खसखसचं सेवन तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. पण याचं जास्त प्रमाणातही सेवन करू नये.7 / 11मेथीचे दाणे - रोज एक चमचा मेथीचे दाणे खाल्ले तर शरीरातील उष्णता दूर होण्यास मदत होते. 8 / 11थंड दूध घ्या - उन्हाळ्यात अनेकांना दूध पिणं आवडत नाही. पण यात थोड मध घालून सेवन केल्यास शरीरातील उष्णता दूर होऊ शकते.9 / 11चंदनाचा लेप - शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही चंदनाचा लेप लावू शकता. तुम्हाला जास्त गरम होत असेल तर चंदनाचा लेप पायांवर आणि कपाळावर लावा. याने तुम्हाला थंडावा वाटेल.10 / 11व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा - उन्हाळ्यात थंड वाटावं म्हणून तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचं सेवन करा. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त भाज्या, फळं शरीरातील तापमान कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे लिंबू, संत्री, मोसंबीचं सेवन करा.11 / 11छासचं सेवन करा - उन्हाळ्यात छासचं सेवन केल्याने फायदा होतो. याने पोट चांगलं राहतं. याने शरीरातील उष्णता दूर होते. आणखी वाचा Subscribe to Notifications