शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक नाही पूर्ण 10 प्रकारच्या कॅन्सरचं कारण आहेत हे 5 पेय पदार्थ, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 5:45 PM

1 / 8
कॅन्सर एक घातक आणि जीवघेणा आजार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कॅन्सर जगभऱात मृत्यूचं एक मोठं कारण आहे. एका आकडेवारीनुसार, 2020 मध्ये कॅन्सरमुळे जवळपास 10 मिलियन लोकांचा मृत्यू झाला. कॅन्सर अनेक प्रकारचे असतात. यात सर्वात घातक आहेत ब्रेस्ट, लंग्स, कोलन, रेक्टम, प्रोस्टेट आणि ब्लड कॅन्सर.
2 / 8
कॅन्सरची कारणं काय आहेत? - WHO ने स्पष्ट सांगितलं आहे की, कॅन्सरने होणारे जवळपास एक तृतीयांश मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे, हाय बॉडी मास इंडेक्स म्हणजे लठ्ठपणा, दारूचं सेवन, फळं आणि भाज्यांचं सेवन आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने होतात. जर याचं निदान लवकर झालं तर योग्यप्रकारे उपचार करता येतात.
3 / 8
चुकीचं खाणं-पिणं हे कॅन्सरचं एक मोठं कारण आहे आणि ही बाब WHO सहीत अनेक मोठ्या संघटनांनी मानलं आहे. काही असे पेय पदार्थ आहेत ज्यांचं सेवन तुम्ही रोज करता. हे पेय पदार्थ अनेक प्रकारचे कॅन्सर आणि इतर गंभीर समस्याही होतात. जर तुम्हाला कॅन्सरपासून वाचायचं असेल तर तुम्ही यांपासून वाचलं पाहिजे किंवा त्यांचं कमी प्रमाणात सेवन केलं पाहिजे.
4 / 8
दारूमुळे होतो कॅन्सर - अनेक रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे की, दारूच्या सेवनामुळेही कॅन्सर होतो. याच्या अधिक सेवनाने नेक, लिव्हर, ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सर होऊ शकतो. प्रश्न हा आहे की, एका दिवसात किती दारूचं सेवन करावं? याचं सोपं उत्तर आहे दारू पिऊ नये. तरीही CDC चा सल्ला आहे की, महिलांना एका दिवसात एक ड्रिंक आणि पुरूषांनी दोन ड्रिंकपेक्षा जास्त घेऊ नये.
5 / 8
बॉटलचं पाणी अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण - आजकाल जास्तीत जास्त लोक बॉटलचं पाणी पितात. अनेक ठिकाणी तर बॉटलचं पाणीच सप्लाय केलं जातं. बॉटलमध्ये बिस्फेनॉल ए किंवा BPA आढळून येतं. जे कॅन्सरसाठी जबाबदार आहे. रिसर्चमधून समोर आलं आहे की, बीपीए एक हार्मोन अवरोधकच्या रूपात काम करतं. जे नंतर कॅन्सरचं कारण बनू शकतं. रिसर्चमधून समजलं की, बीपीएमुळे ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि चयापचयसंबंधी विकारांचा धोका वाढतो.
6 / 8
कॅन्सरचं कारण आहे कॉफी - असं मानलं जातं की, फार जास्त कॉफीचं सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. अमेरिकन इन्सिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चने सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर विना क्रीम, साखर आणि फ्लेवर असलेलीच कॉफी प्यावी. कारण यातील शुगर आणि क्रीममधील फॅटमुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो आणि याने ब्लड शुगरही वाढते.
7 / 8
एनर्जी ड्रिंक्स - एनर्जी ड्रिंक्स आणि कॅन्सरमध्ये कोणताही थेट संबंध नाही. पण एक्सपर्ट्स मानतात की, एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफीन आणि शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. जे अनेक प्रकारच्या समस्यांचं कारण बनू शकतं. जसे की, लठ्ठपणा किंवा डायबिटीस.
8 / 8
सोडा - जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांना आढळून आलं की, डार्क कलरच्या सोड्यामध्ये 4 मेल असतं जे कॅन्सरचं तत्व आहे. असं मानलं जातं की, हे तत्व अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठी जबाबदार आहे. जर तुम्हाला कॅन्सरपासून वाचायचं असेल तर तुम्ही सोड्याचं सेवन करू नका.
टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स