According to research this shower mistake can cause heart attack
Heart Attack : आंघोळ करताना या चुकीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, तुम्हीही असंच करताय का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:08 PM1 / 7हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा तुमच्या हृदयाच्या मांसपेशींच्या एका भागात पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. असं हृदयाच्या धमण्या अचानक बारीक झाल्याने आणि त्यात रक्तप्रवाह हळुवार होत असल्याने होतं. हे सामान्यपणे रक्ताच्या गाठी तयार झाल्याने होतं. याने तुमच्या हृदयाला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. ज्याचे परिणाम धोकादायक ठरू शकतात.2 / 7हार्ट अटॅक येण्याला वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, तुमचं वय, फॅमिली हिस्ट्री, रक्तादाब, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं इत्यादी. यासोबतच काही बाहेरील किंवा लाइफस्टाईल संबंधी गोष्टीही हृदयावर अचानक दबाव टाकू शकतात. असंच एक कारण म्हणजे थंड पाण्याचं शॉवर घेणं. तसेच जास्त वेळा आंघोळ केल्यानेही त्वचेचे मायक्रोबायोम, त्वचेसाठी फायदेशीर बॅक्टेरिया आणि पेशींवर नकारात्मक प्रभाव पडतो.3 / 7थंड पाण्याने हृदयावर होतो परिणाम - काही तज्ज्ञांनुसार, अचानक थंड पाण्याच्या संपर्कात येणं फार धोकादायक ठरू शकतं. खासकरून हृदयरोग असलेल्या लोकांसाठी. याने हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हृदयाचे ठोके चुकू शकतात. थंड पाण्याने शरीराला झटका बसतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह हळुवार होतो. अशात हृदय जोरात धडधडणं सुरू करतं. जेणेकरून पूर्ण शरीरात रक्त पंप करू शकेल. यामुळे रक्तवाहिन्यांवर दबावही वाढतो.4 / 7थंड पाण्याने कसा येईल हार्ट अटॅक - कितीही फिट व्यक्ती असला तरी थंड पाण्याने त्याना हार्ट अटॅक येऊ शकतो. रिसर्चमधून समोर आलं आहे की, हे सामान्यपणे गरमीच्या दिवसात होतं. तेव्हा लोक जास्त थंड पाण्याने आंघोळ करतात. जर्नल ऑफ फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चमधून हे समोर आलं होतं की, थंड पाण्याने अचानक आंघोळ करणं नुकसानकारक ठरू शकतं.5 / 7हार्ट अटॅकची लक्षणं - सामान्यपणे जास्तीत जास्त हार्ट अटॅकमध्ये छातीच्या केंद्रात किंवा डावीकडे वेदना वा दबाव असं जाणवतं. हे काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालू शकतं किंवा दूर जाऊन परत येऊ शकतं. यावेळी श्वास घेण्यासही त्रास होतो. थंड घाम येणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं एक सामान्य लक्षण आहे. तुम्हाला फार थकवा किंवा कमजोरी जाणवू शकते. छातीसोबतच जबडा, पाठ, मान, हात किंवा खांदे दुखत असतील हेही हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात. तसेच हार्ट अटॅकच्या सामान्य लक्षणांमध्ये मळमळ किंवा उलटी यांचाही समावेश आहे.6 / 7आंघोळीची योग्य पद्धत - थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी बकेट चांगला आणि सुरक्षित पर्याय असू शकते. कारण तुम्ही कोणत्याही झटक्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही शरीरावर पाण्याचा प्रवाह नियंत्रित करू शकता. कोणतीही खतरनाक प्रतिक्रिया कमी करण्यासाठी हळुवारपणे शॉवरच्या पाण्यात प्रवेश करा. कोणतीही धोका टाळण्यासाठी हलक्या कोमट पाण्याने आंघोळ करा मग थंड पाण्याचा वापर करा.7 / 7थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे - थंड पाण्याने आंघोळ करणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. थंड पाण्याने आंघोळ करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला आधीच हृदरोगाची समस्या असेल तर थंड पाण्याने आंघोळ करू नका. तसेच थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. काही रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ करणारे लोक कमी आजारी पडतात. तसेच शरीरावरील सूजही कमी होते. काही तज्ज्ञ सांगतात की, थंड पाण्याने तुमचं वय वाढतं आणि पचनक्रियाही चांगली राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications