शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनियावर परिणामकारक ठरतात 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:46 PM

1 / 9
डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांची सध्या साथ पसरली आहे. हवामानात बदल होत असल्याने आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणते पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे जाणून घ्या.
2 / 9
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अ‍ॅन्टीऑक्सीडेंट, फायबरचे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे संत्र आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
3 / 9
पपई त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असते. पपईचं दररोज सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन्स, पिंपल्स यांसारख्या समस्या दूर होतात. तसेच प्लेटलेट वाढवण्यासाठी पपई खाणं आवश्यक आहे.
4 / 9
खिचडीमध्ये फायबर आणि पोषक तत्त्व असल्याने आजारापासून लढण्याची ताकद मिळते. यामुळे पचन शक्ती चांगली राहते.
5 / 9
आलं खाल्ल्यास इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. आल्यामध्ये अ‍ॅन्टी-इंफ्लेमेटरी आणि अ‍ॅन्टी बॅक्टीरियल गुण असतात त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
6 / 9
ग्रीन टी किंवा हर्बल टी घेणं आरोग्यासाठी हितकारक आहे.
7 / 9
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसेच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते. थायरॉइड हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचे काम नारळ पाणी करते.
8 / 9
गाजर, काकडी आणि अन्य भाज्यांचा रस हा शरिरासाठी फायदेशीर असतो. भाज्यांमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असल्याने त्याचं सेवन करणं महत्त्वाचं आहे.
9 / 9
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
टॅग्स :dengueडेंग्यूHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारscjएससीजे