Add these 5 anti inflammatory foods that fight inflammation
शरीरासाठी घातक ठरते अंतर्गत सूज, 'या' फूड्सचं सेवन करून करा दूर By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 10:34 AM1 / 9अनेक जखम झाल्याने, पडल्याने किंवा ठेच लागल्यावर शरीर रिस्पॉन्स करतं. त्या भागावर सूज येऊ लागते. याला एक्यूट इन्फ्लेमेशन म्हणतात. यात आपलं शरीर हीलिंगसाठी इंफ्लेमेटरी सेल्स जखम लागलेल्या जागेवर पाठवण्याचं काम करतं. शरीरासाठी याला चांगलं मानलं जातं. कारण सेल्स प्रभावित अवयवाला इन्फेक्शन होण्यापासून बचाव करतात.2 / 9पण जर दुसरीकडे तुम्हाला काही जखम झाली नसेल आणि तुमचं शरीर इंफ्लेमेटरी सेल्स पाठवणं सुरू ठेवतं असेल तर या स्थितीला क्रोनिक इंफ्लामेशन म्हणतात. जी पुढे जाऊन अनेक आजाराचं कारण ठरू शकते.3 / 9शरीरासाठी क्रोनिक इंफ्लामेशन फार गंभीर असतं. यामुळे मधुमेह, हृदयरोग, अर्थराइटिस, ऑटो इम्यून डिजीज, डिप्रेशन, क्रोनिक हेपेटायटिस, रीनल डिजीज इत्यादींचा धोका असतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी अॅंटी-इंफ्लेमेटरी फूड्सचा डाएटमध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.4 / 9बेरीज - यात पहिलं नाव येतं ते बेरीजचं. तुम्ही तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, क्रैनबेरीपासून ते ब्लूबेरीचा समावेश करा. यात अॅंटी-ऑक्सिडेंटसोबत अॅंटी-इंफ्लामेटरी तत्वही भरपूर असतात.5 / 9हिरव्या पालेभाज्या - अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक आणि केळीमध्ये व्हिटॅमिन के असतं. यात नॅच्युरल अॅंटी-ऑक्सिडेंट, पॉलीफेनॉलसोबत काही असे केमिकल्स असतात, जे शरीराला क्रोनिक इंफ्लामेशनपासून लढण्यास मदत करतात.6 / 9हळद - हळदीमध्ये असलेला करक्यूमिन अॅंटी-ऑक्सीडेंट आणि अॅंटी-इंफ्लामेटरी प्रभावासाठी ओळखला जातो. यात भरपूर फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. जे शरीराला लढण्यास मदत करतात आणि शरीरातील सूज कमी करण्यासही मदत करतात.7 / 9एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑयल - सूज कमी करण्यासाठी एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑयलचं सेवन फायदेशीर मानलं जातं. यात ओलेओकॅंथल, अॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर असतात. ज्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.8 / 9नट्स - नट्स जसे की, अक्रोड, बदाम यांचं सेवन करा. या ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं, ज्यात अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणही असतात.9 / 9टोमॅटो - टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं एक तत्व असतं. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे टोमॅटोचा आहारात समावेश करा. आणखी वाचा Subscribe to Notifications