शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! ताप, उलट्या, पोटदुखी अन्... कोरोनानंतर 'या' व्हायरसचा मोठा धोका; हवेतून होतोय प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 12:27 PM

1 / 11
कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक ठिकाणी अद्यापही गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2 / 11
ज्या प्रकारे कोरोना व्हायरस आला, त्याच प्रकारे एडिनो व्हायरस देखील आला आहे. पण हा व्हायरस कसा पसरतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे? त्याचे विश्लेषणही खूप महत्त्वाचे आहे. कारण एडिनो व्हायरला सावधगिरीनेच हरवलं जाऊ शकतं.
3 / 11
एडिनो व्हायरस हा एक विषाणूजन्य आजार आहे, त्यामुळे कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. कोरोना व्हायरसप्रमाणेच हा व्हायरस देखील हवेतून म्हणजेच खोकल्याने किंवा शिंकण्याने पसरतो.
4 / 11
जर एडिनो व्हायरस पृष्ठभागावर कुठेतरी उपस्थित असेल आणि कोणीतरी त्याला स्पर्श केला किंवा त्याच्या संपर्कात आला तर त्या व्यक्तीला देखील व्हायरसची लागण होऊ शकते. एडेनो व्हायरसची लक्षणे कोणती आहे हे जाणून घेऊया...
5 / 11
एडिनो व्हायरसची लक्षणेही कोरोना व्हायरससारखीच असतात. त्यामुळेच हा कोरोनाचा आणखी एक प्रकार आहे का, या संभ्रमात मुलांचे पालकही आहेत. लक्षणेही तीच आहेत जी कोरोनामध्ये दिसतात. एडिनो व्हायरसचा संसर्ग झाल्यास सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसतात.
6 / 11
ताप, घसा कोरडा पडणे, एक्यूट ब्रोंकायटिस यासारख्या समस्याही एडेनोमुळे होतात. याची लागण झालेल्या व्यक्तीला निमोनिया, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या तक्रारीही असतात. तसेच मूत्राशयाच्या संसर्गाचा धोकाही असतो.
7 / 11
कोरोना व्हायरसचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. शास्त्रज्ञ आणि डॉक्टरही कोरोना हवेत असल्याचे सांगत आहेत. जर कोरोनाचे कोणतेही म्युटेशन घातक ठरले तर ते पुन्हा मृत्यूचे कारण बनू शकतात. कोविड व्यतिरिक्त इतर व्हायरसचा धोकाही कायम आहे. एडेनो व्हायरस तसाच आहे.
8 / 11
या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी, कमीत कमी 20 सेकंदापर्यंत साबणाने हात धुवावेत. हातांनी वारंवार डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. जर कोणी आजारी असेल तर त्याच्या संपर्कात येऊ नका.
9 / 11
आजारी असताना घरीच राहा, घराबाहेर पडू नका. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू आणि मास्क वापरा. तुमची भांडी इतरांसोबत शेअर करणे टाळा. आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
10 / 11
कोरोना व्हायरसवर सर्वात प्रभावी औषध म्हणजे सावधगिरी आहे. या धोकादायक व्हायरसवर सावधगिरीने मात करण्यात येत आहे. नंतर कोरोनाची लस आली ज्याचा चांगला परिणाम दिसून आला. डॉक्टर आता एडिनो व्हायरससाठीही तेच सांगत आहेत.
11 / 11
एडिनो व्हायरससाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार नाही. बर्‍याच वेळा, एडिनो व्हायरस संसर्गामध्ये सौम्य लक्षणे असतात आणि वेदना किंवा ताप यावर औषधाने बरे केले जाऊ शकते. त्यामुळे घाबरू नका, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत