Advantages and disadvantages of daily drinking milk
रोज दूध पिणे आरोग्यासाठी घातक की फायदेशीर? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 10:08 AM1 / 7दूध हा दैनंदीन जीवनात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांना दूध प्यायला आवडत नाही. बऱ्याच खाद्यपदार्थामध्ये दुधाचा वापर होतो. पण काही प्रमाणात दूध हे पचनास जड असल्यामुळे त्याचे काही दुष्परीणाम आहेत. चला तर मग जाणून घेऊया रोज दूध पिणं योग्य आहे की नाही. (Image credit-The list)2 / 7दुधाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. दूध उकळून ते आपण ते पिऊ शकतो. परंतु उकळल्यामुळे दुधातील कॅल्शियम कमी होतं आणि ते पचवण्यासाठी जड जातं. त्यामुळेच रक्तप्रवाहामधून कॅल्शियम पोहोचत नाही. 3 / 7दूध हे त्वचेस कोमल बनवतं सोबतच मुलायम आणि चमकदार हि बनवतं. दुधात त्वचेसाठीचे फायदेशीर असणारे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे पण असतात. दिवसातून कमीत कमी दोन ग्लास दुध सेवन करणे जरुरी आहे.4 / 7दुधामुळे बऱ्याच आजारांना शरीरापासून दूर ठेवता येते. या रोगांमध्ये रक्तदाबाच्या समस्येपासून ते हृदयरोगाच्या समस्यांपर्यंतचा समावेश आहे. तसेच दुधामुळे शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रित राहते. 5 / 7हाडांना बळकट बनविण्यासाठी दूध फायदेशीर ठरते. दुधातील फायदे त्यातील कॅल्शियम मुळेच असतात. आणि यासाठी शरीरात विटामीन – डी ची गरज असते.6 / 7जर तुम्ही डाएट करत असाल. आहारात दुधाचा समावेश करावा. पण जर हेच दुध भेसळयुक्त असेल. तर शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं. 7 / 7झोपण्याआधी दूध प्यायल्यास गाढ झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येत नसेल तर दूध प्या, असे केल्यास नक्की फायदा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications