After Corona now Rift Valley Fever, WHO warning, What are the symptoms of the disease?
कोरोनानंतर आता Rift Valley Fever, WHO चा इशारा; काय आहेत आजाराची लक्षणे? By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 9:08 PM1 / 8कोरोना व्हायरसचा(Coronavirus) धोका अद्याप कमी झालेला नाही. आशिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने कहर केला आहे. अर्थात, भारतात कोरोनाची परिस्थिती फारशी वाईट नाही, पण काही शाळकरी मुलांमध्ये कोरोनाची लागण झाल्याने चिंता नक्कीच निर्माण झाली आहे. 2 / 8याचवेळी संशोधकांनी रिफ्ट व्हॅली फिव्हरचा(Rift Valley Fever) एक विचित्र आजार शोधून काढला आहे, काश्मीरमधील व्हायरोलॉजिस्ट डॉ. सफदर गनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवी पेशींमध्ये रिफ्ट व्हॅली फिव्हर (RVF) विषाणू कसा पसरतो हे शोधून काढले आहे 3 / 8हा आजार प्राण्यांमध्ये आढळतो परंतु या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भीती व्यक्त केली आहे की, यामुळे महामारी होऊ शकते. ज्यामुळे भविष्यात साथीचे रोग होऊ शकतात. चला जाणून घेऊया काय आहे हा आजार? आणि त्यामुळे मानवजातीला किती धोका निर्माण होऊ शकतो?4 / 8रिफ्ट व्हॅली फीव्हर (RVF) हा एक विषाणूजन्य रोग आहे जो सामान्यतः आफ्रिकेतील पाळीव प्राण्यांमध्ये आढळतो, जसे की गुरे, म्हैस, मेंढ्या, शेळ्या आणि उंट. मात्र, हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्येही पसरू शकतो.5 / 8हा रोग रक्त, शरीरातील द्रव किंवा संक्रमित प्राण्यांशी संपर्क साधून किंवा संक्रमित डासांच्या चाव्यामुळे मानवांमध्ये पसरतो. या आजारामुळे जनावरांमध्ये रक्तस्त्राव झाल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.6 / 8सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, रिफ्ट व्हॅली फिव्हर हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो असा सूचित करणारा कोणताही ठोस पुरावा किंवा अभ्यास नाही.7 / 8सेल जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात, डॉ. गनी आणि त्यांच्या टीमला आढळून आले की, डासांमुळे होणारा रिफ्ट व्हॅली फिव्हरचा विषाणू मानवी पेशींमध्ये प्रथिनांच्या माध्यमातून प्रवेश करतो. 8 / 8CDC नुसार, या विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर २-६ दिवसांनी अनेक लक्षणे दिसू शकतात. सहसा कोणतीही लक्षणे नसतात किंवा सौम्य आजार असतो ज्यामध्ये त्यांना ताप, अशक्तपणा, पाठदुखी आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. साधारणपणे रुग्णाची लक्षणे सुरू झाल्यानंतर दोन दिवस ते आठवडाभरात बरी होतात. RVF ची लक्षणे ४ ते ७ दिवस राहतात आणखी वाचा Subscribe to Notifications