air pollution increases the risk of corona virus by 30 percent revealed in the- report
Corona Virus : चिंताजनक! वायू प्रदूषणामुळे 30 टक्क्यांनी वाढतो कोरोनाचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 7:06 PM1 / 8देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून पाच लाखांहून अधिक लोकांनी आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच लोकांना नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 2 / 8सध्या देशात आणि जगात कोरोना व्हायरसचा धोका हा थोडा कमी झाला आहे. पण तरीही रोज काही प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनामुळे मृतांच्या संख्येतही मोठी घट झाली असली तरी सतर्क राहणं गरजेचं आहे. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. 3 / 8वायू प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढतो, असं एका रिपोर्टमधून आता समोर आलं आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, वायू प्रदूषणामुळे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 30 टक्क्यांपर्यंत वाढतो. प्रदूषण करणाऱ्या घटकांमध्ये पीएम 2.5 आणि नायट्रोजन डायऑक्साइड असल्याचे आढळून आले आहे.4 / 8रिसर्चमध्ये असेही दिसून आले आहे की, ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण केले गेले नाही ते देखील वायू प्रदूषणामुळे कोरोनाला बळी पडू शकतात. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या संशोधकांसह एका टीमने हॉस्पिटलमधील रुग्णांच्या वैद्यकीय नोंदींचा अभ्यास केला. 5 / 8या अभ्यासानुसार, 2021 च्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाचे 50,010 रुग्ण आढळले, ज्यांचे वय 12 वर्षे किंवा त्याहून अधिक होते. त्या वेळी अधिक लोकांना SARS-CoV-2 च्या डेल्टा फॉर्मची लागण झाली होती, तर अनेकांचे लसीकरण करण्यात आले होते.6 / 8रिसर्च करणारे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ एनी जियांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील लस रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यात यशस्वी ठरत आहे. परंतु लसीकरण झालेल्या आणि प्रदूषित हवेच्या संपर्कात आलेल्या लोकांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. 7 / 8अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिन या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. जगभरात कोरोनावर रिसर्च करण्यात आला असून त्यामधून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 8जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 62 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात कोरोनाने 6,547,814 लोकांचा बळी गेला आहे. तर 622,585,710 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला आहे आणखी वाचा Subscribe to Notifications