शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनामुळे नाही तर 'या' कारणामुळे देशात वर्षभरात 16 लाख लोकांचा मृत्यू; वेळीच व्हा सावध अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 10:58 AM

1 / 9
देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. असं असताना अनेक आजारांनी देखील डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच काही समस्यांचा सामना देखील करावा लागत आहे. असं असतानाच आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
2 / 9
दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 339 नोंदवण्यात आला आहे. जी अत्यंत गंभीर श्रेणीत गणली जाते. राजधानीची हवा अतिशय विषारी झाली आहे. या वायू प्रदूषणामुळे मृत्यूचं तांडव सध्या सुरू आहे.
3 / 9
द लॅन्सेंट मेडिकल जर्नलच्या 2019 च्या अहवालानुसार, जगभरात प्रदूषणामुळे 90 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या भारतात वायू प्रदूषणामुळे 16 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वृद्धांची संख्या जास्त होती. त्यामुळे वृद्धांना सर्वाधिक धोका आहे.
4 / 9
फुफ्फुसाच्या कॅन्सरसह श्वसनाचे अनेक धोकादायक आजार हवेच्या प्रदूषणामुळे होतात, असे या अभ्यासात सांगण्यात आले. ज्यामुळे मृत्यू वाढत आहेत. हा आजार इतका जीवघेणा आहे की, देशात दररोज जवळपास सहा हजारांहून अधिक लोक प्रदूषणामुळे आपला जीव गमावत आहेत.
5 / 9
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषणामुळे फुफ्फुसाशिवाय हृदयाला अनेक समस्या निर्माण होतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, वायू प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. वायू प्रदूषण मोठे आव्हान पुढे आहे. हे गंभीर असल्याचं ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अरुण शाह यांनी सांगितलं.
6 / 9
विशेषत: थंडीच्या हंगामात प्रदूषणाची समस्या खूप वाढते. हवा खराब होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरणारे खड्डे आणि वाहनांचे प्रदूषण. प्रदूषणामुळे देशाचे आर्थिक नुकसानही होत आहे. कोरोनाच्या महामारीनंतर श्वसनाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
7 / 9
डॉ. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणात असलेले कण (PM2.5) अनेक रोगांचा धोका वाढवतात. जर एखाद्या व्यक्तीला आधीच दमा, ब्राँकायटिस किंवा सीओपीडीची समस्या असेल तर प्रदूषणामुळे ती वाढते. या ऋतूमध्ये दम्याच्या रुग्णांना अस्थामा अटॅक म्हणजेच दम्याचा झटका येतो.
8 / 9
सोओपीडीच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासते. त्यामुळे वायू प्रदूषणापासून आपला बचाव करा. वायू प्रदूषणापासून कसं सेफ राहायचं ते जाणून घेऊया... बाहेर जाताना मास्क घाला, धूळ आणि धुक्यापासून संरक्षण, खाताना काळजी घ्या.
9 / 9
स्वच्छ आणि आरोग्याला योग्य असे अन्न खा. मॉर्निंग वॉक टाळा, तुम्ही घरात एअर प्युरिफायर लावू शकता, तुम्हाला दमा असल्यास नेहमी तुमच्यासोबत इनहेलर ठेवा. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्यair pollutionवायू प्रदूषण