air pollution leads to anxiety decrement of cognitive ability says doctors
सावधान! प्रदुषणाचा फुफ्फुसावरच नाही तर मेंदूवरही होतोय परिणाम; 'ही' आहेत सुरुवातीची लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 5:15 PM1 / 12दिल्लीची हवा दिवसेंदिवस इतकी विषारी होत चालली आहे की तिथल्या लोकांचा श्वास कोंडला आहे. या विषारी हवेमुळे केवळ फुफ्फुसाचे आजारच नाही तर मेंदू, शरीराचे अवयव आणि हृदयविकारही होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2 / 12बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पल्मोनरी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. नीरज गुप्ता य़ांच्या मते वृद्ध, शाळेत जाणारी मुलं आणि गर्भवती महिलांना या वायू प्रदूषणामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या असू शकतात. जसं की डोकेदुखी, चिडचिड, गोंधळ, अशक्तपणा येऊ शकतो.3 / 12वायू प्रदूषणादरम्यान हवेत न्यूरोकॉग्निटिव वाढू लागतं. त्यामुळे ते नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडशी थेट जोडलेलं आहे. त्याचा माणसाच्या नर्व्हस सिस्टमवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे दिल्ली आणि आसपासची परिस्थिती गॅस चेंबरसारखी आहे, असं म्हणतात.4 / 12हवेत अनेक हानिकारक वायू मिसळतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. नुकताच शाळेत जाणाऱ्या मुलांवर एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की खराब AQI एअर क्वालिटी इंडेक्सचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. 5 / 12सध्या हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हवेच्या संपर्कात न येणे आणि शक्य तितके घरातच राहणे. ज्या लोकांना आधीच अस्थमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) आणि इस्केमिक हृदयरोग यांसारखे आजार आहेत, त्यांची स्थिती या हवेमुळे बिघडू शकते. अशा रुग्णांनीही शक्यतो घरीच थांबावे. 6 / 12दिल्लीत रविवारी सलग सहाव्या दिवशी विषारी धुके पसरले. एआयक्यूची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी हवेमुळे प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा गंभीर पातळीवर पोहोचली होती.7 / 12AQI शनिवारी दुपारी 4 वाजता 415 वरून रविवारी सकाळी 7 वाजता 460 वर आला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णालयांमध्ये श्वसनाचे आजार किंवा फुफ्फुसाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 8 / 12'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (एम्स) चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की वायू प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोक, स्मृतिभ्रंश आणि मेंदूचे आजार होत आहेत. 9 / 12गुलेरिया म्हणतात की प्रदूषणाने सर्व भागांना प्रभावित केले आहे. मानवी शरीरावर वाईट परिणाम झाला आहे. वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.10 / 12दर हिवाळ्यात हवेचा दर्जा खालावतो आणि त्याबाबत बरीच चर्चा होते पण कोणतीही ठोस कायमस्वरूपी कारवाई होत नाही. शिवाय, डेटा दर्शवितो की वर्षभरातील 50 टक्क्यांहून अधिक दिवस, हवेची गुणवत्ता खराब राहते, ज्यामुळे नागरिकांना बहुतेक दिवस वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांना सामोरे जावे लागते. 11 / 12जे हिवाळ्यात आणखीनच वाढते. दीर्घकाळापर्यंत खोकला, श्वास घेण्यात अडचण, घशात जंतुसंसर्ग यासोबतच रुग्ण चिंता, गोंधळ आणि चिडचिडेपणा वाढल्याच्या तक्रारी करत आहेत. वायू प्रदूषण हे एक मोठं संकट आहे जे त्वरित कमी करणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12जे हिवाळ्यात आणखीनच वाढते. दीर्घकाळापर्यंत खोकला, श्वास घेण्यात अडचण, घशात जंतुसंसर्ग यासोबतच रुग्ण चिंता, गोंधळ आणि चिडचिडेपणा वाढल्याच्या तक्रारी करत आहेत. वायू प्रदूषण हे एक मोठं संकट आहे जे त्वरित कमी करणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications