चिंताजनक! हवेतून पसरणाऱ्या कोरोना संक्रमणाबाबत संशोधनातून मोठा खुलासा; तज्ज्ञ म्हणाले की... By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 4:52 PM
1 / 10 सध्या कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. जगभरातील संशोधकांचे या व्हायरसच्या प्रसाराबाबत संशोधन सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत करण्यात आलेल्या अभ्यासातून एक नवीन माहिती समोर आली आहे. हे संशोधन SARS-CoV-2 च्या मायक्रोड्रॉपलेट्सवर करण्यात आलं होतं. याबाबतचा अभ्यास अमेरिकेतील नेब्रास्क विद्यापीठातील तज्ज्ञांनी केला आहे. 2 / 10 मागील काही महिन्यांपासून वैज्ञानिक दावा करत आहेत. की कोरोना व्हायरस रुग्णांच्या नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून पसरतो. पण व्हायरसचे लहान लहान कण सुद्धा संक्रामक ठरू शकतात. याबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते. या नवीन अभ्यासात तज्ज्ञांनी SARS-CoV-2 च्या मायक्रोड्रॉपलेट्सना पाच मायक्रोनच्या माध्यामातून परिभाषित केले आहे. 3 / 10 या अभ्यासातून दिसून आलं की बोलण्यातून किंवा शिंकण्यातून नाही तर बोलताना किंवा श्वास घेतानाही कोरोनाचं संक्रमण पसरू शकतं. सहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरूनही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगसाठी सहा फुटांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे. 4 / 10 तज्ज्ञांच्या टीनमे मार्च महिन्यात एक लेख प्रकाशित केला होता. त्यात रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या खोलीतील हवेत व्हायरस असल्याचे स्पष्ट केले होते. आता हा अभ्यास medrxiv.org वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे. 5 / 10 नेब्रास्का मेडिकल सेंटरचे एसोसिएट प्रोफेसर जोशुआ संतारपिया यांनी सांगितले की या संशोधनासाठी नमुने गोळा करणं हे खूपच कठीण होतं. 6 / 10 मोबाईलप्रमाणे दिसत असेल्या उपकरणाचा या संशोधनासाठी वापर करण्यात आला होता. या संशोधनासाठी ५ कोरोना रुग्णांच्या खोल्यांमधील नमुने मिळवण्यात आले होते. 7 / 10 रुग्ण जेव्हा बोलतात किंवा हसतात तेव्हा त्यांच्या तोंडातून बाहेर येत असलेले मायक्रोड्रॉपलेट्से हे दीर्घकाळपर्यंत हवेत राहतात. यांना एरोसोल असेही म्हणतात. 8 / 10 मोठ्या ड्रॉपलेट्सच्या तुलनेत लहान ड्रॉपलेट्स जास्त दूरपर्यंत पोहोचतात. दरम्यान हा अभ्यास सध्या कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. तज्ज्ञांचे सखोल संशोधन सुरू आहे. 9 / 10 मोठ्या ड्रॉपलेट्सच्या तुलनेत लहान ड्रॉपलेट्स जास्त दूरपर्यंत पोहोचतात. दरम्यान हा अभ्यास सध्या कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. तज्ज्ञांचे सखोल संशोधन सुरू आहे. 10 / 10 मोठ्या ड्रॉपलेट्सच्या तुलनेत लहान ड्रॉपलेट्स जास्त दूरपर्यंत पोहोचतात. दरम्यान हा अभ्यास सध्या कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. तज्ज्ञांचे सखोल संशोधन सुरू आहे. आणखी वाचा