शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दारू पिणं सोडू शकत नसाल तर जीव वाचवण्यासाठी इतकं तर करूच शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 11:34 AM

1 / 8
दारू पिऊन होणाऱ्या नुकसानांबद्दल डॉक्टर आपल्याला नेहमीच इशारा देत असतात. एक्सपर्ट सांगतात की, आपलं शरीर एका तासात केवळ एक ड्रिंक किंवा दिवसातून केवळ तीन ड्रिंक पचवू शकतं. पण एकापेक्षा जास्त स्टॅंडर्ड ड्रिंक पिणं नेहमी घातक ठरू शकतं. ज्या दिवसांपासून तुम्ही दारू पिणं सुरू करता त्या दिवसापासून त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. दारू पिणाऱ्या लोकांच्या शरीरावर काही प्रभाव लगेच दिसू लागतात. तर काही उशीरा दिसतात.
2 / 8
काही लोक लिमिटीमध्ये दारूचं सेवन करतात तर काही लोक इतकी दारू पितात की, त्यांना शुद्धही राहत नाही. आम्ही दारू पिण्याचा सल्ला अजिबात देत नाही. पण तरीही तुमच्याकडून दारू सोडणं होत नसेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामुळे तुम्ही काही दुष्परिणाम दूर करू शकता. जर तुम्हीही नियमित दारू पित असाल तर खालील उपाय करू शकता.
3 / 8
1) दारू किती प्रमाणात प्यावी? - मित्रांसोबत एन्जॉय करणं असो वा पार्टी असो, काही लोक अनलिमिटेड दारू पितात. त्यानंतर त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. Healthdirect.gov.au नुसार, वयस्कांना दारूच्या दुष्परिणामांपासून वाचायचं असेल तर आठवड्यातून 10 ड्रिंक्सपेक्षा जास्त आणि दिवसात चार ड्रिंक्सपेक्षा जास्त पिऊ नये. एक स्टॅन्डर्ड ड्रिंकची साइज 330 मिली बीअर आणि 30 मिली हार्ट अल्कोहोल तसेच 150 मिली वाइन अल्कोहोल असतं.
4 / 8
एका ड्रिंकमध्ये जवळपास 10 ग्रॅम इथेनॉल(अल्कोहोल) असतं. या प्रमाणात शरीर एका तासात प्रोसेस करतं. त्यामुळे ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त दारू कधीच पिऊ नये. जर तुम्ही दररोज ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त दारू पित असाल तर त्याने दुर्घटना, शारीरिक नुकसान किंवा हॅंगओवर होऊ शकतो. जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात दारू पित असाल तर याने हृदय, कॅन्सर, किडनी किंवा मेंदूसंबंधी आजार होण्याची शक्यता जास्त असते.
5 / 8
2) पिण्याआधी किंवा पिल्यानंतर काही खावे - दारू तुमच्या पोटात आणि छोट्या आतड्यांच्या माध्यमातून ब्लडस्ट्रीमध्ये जाते. जेव्हा तुम्ही दारू पिणं सुरू करत तेव्हा आणि पोट रिकामं असेल तर दारू ब्लडस्ट्रीममध्ये वेगाने जाते. असं झालं तर शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे पिण्याआधी आणि पिताना काहीना काही नक्की खावं. दारू पिण्याआधी भरपूर पाणी प्यावं. स्नॅक्स खाणं टाळा. मखाने, ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे, पनीर दारूसोबत किंवा नंतर खाऊ शकता.
6 / 8
3) किती वेळात एक ड्रिंक प्यावा - रक्तात अल्कोहोलचं जे प्रमाण असतं त्याला बीएसी म्हणतात. रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण हे सांगतं की, दारू शरीरावर कशाप्रकारे प्रभाव टाकणार आहे. शरीत प्रति तास केवळ 1 स्टॅंडर्ड ड्रिंकलाच प्रोसेस करू शकतं. पण जर तुम्ही अधिक वेगाने दारूचं सेवन कराल तर बीएसी तेवढंच वाढेल आणि शरीराचं अधिक नुकसान होईल. त्यामुळे प्रयत्न करा की, एका तासात एक स्टॅंडर्ड ड्रिंकपेक्षा अधिक सेवन करू नये.
7 / 8
4) दारू पिताना पैज लावणं टाळा - तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, दारू पिताना लोक काहीना काही पैज लावतात. जसे की, एकाच वेळी बॉटल संपवणे, टॉप टू बॉटम पेग किंवा कोण जास्त दारू पितं इत्यादी. असं करणं शरीरासाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे कधीच दारू पिताना खेळ, पैज करू नये. याने जास्त दारू पिली जाते. अल्कोहोल एनर्जी ड्रिंकसोबत मिक्स करू नका. याने तुम्ही जास्त ड्रिंक करू शकता.
8 / 8
5) दारू पिऊन गाडी चालवू नका - भारतात ब्लड अल्कोहोल लेव्ह प्रति 100 मिलमीलीटर रक्तात 0.03 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे 100 मिलीलीटर रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल असेल तर गाडी चालवणं कायदेशीर गुन्हा आहे. पण तशीही दारू पिऊन कधीच गाडी चालवू नये. जर असं केलं तर अपघात होण्याचा धोका अधिक असतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य