शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यासोबत भरपूर आहेत नारळाच्या मलाईचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 9:52 AM

1 / 8
उन्हाळ्यात भरपूर लोक नारळाचं पाणी पिऊन शरीर थंड ठेवतात. नारळ्याच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण बरेच लोक नारळाची मलाई खाणं टाळतात. अनेकांना या मलाईचे फायदे माहीत नसतात. आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे वाचून तुम्ही कधीच नारळाची मलाई फेकणार नाही. नारळातील मलाईमुळे शरीर हाटड्रेट ठेवण्यासाठी फार फायदेशीर असते. ही मलाई तुम्ही कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. तसेच यातून निघणाऱ्या दुधाचेही अनेक फायदे होतात.
2 / 8
हृदय निरोगी ठेवते - नारळाच्या मलाईमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं. हे हेल्दी फॅट हृदय निरोगी ठेवतं. तसेच नारळाची मलाई शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयासंबंधी अनेक समस्या होतात.
3 / 8
वाढतं वय लपवते - नारळाच्या मलाईमध्ये अँटीऑक्सीडेंट भरपूर असतात. ज्यामुळे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटीव स्ट्रेसपासून बचाव करण्यास मदत मिळते. त्वचेवर सुरकुत्या दिसत नाही आणि त्वचा तरूण दिसते.
4 / 8
फॅटी अ‍ॅसिड - नारळाच्या मलाईमध्ये फॅटी अॅसिड असतं. जे शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत करतं. तसेच ही मलाई लगेच ऊर्जाही देते. याचं नियमित सेवन करणाऱ्या लोकांना सतत भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं जास्त खाणं याने कंट्रोल होतं आणि तुमचं वजन वाढत नाही.
5 / 8
पोटावरील चरबी होते कमी - पोटावरील चरबी शारीरिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक आजारांचे शिकार होऊ शकता, त्यामुळे नारळातील मलाई फार उपयोगी ठरते. ही 200 ग्रॅम मलाई नियमित खाल्ल्याने कंबरेवरील आणि पोटावरील चरबी कमी करता येते.
6 / 8
फायबर - नारळाच्या एक कप मलाईमध्ये 7 ग्रॅम फायबर असतं. त्यामुळे याने पचनक्रिया अधिक चांगली आणि मजबूत होते. तसेच फायबरयुक्त मलाईच्या सेवनाने पोटाच्या समस्याही दूर होतात.
7 / 8
व्हिटॅमिन ई - नारळाच्या मलाईमध्ये कॅलरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतं. तसेच या व्हिटॅमिन ई सोबतच व्हिटॅमिन सी, के आणि ए सुद्धा असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतं.
8 / 8
पोटॅशिअमने भरपूर असलेली मलाई - नारळाच्या मलाईमध्ये व्हिटॅमिन बी चे सर्व प्रकार असतात. सोबतच यात पोटॅशिअमही भरपूर प्रमाणात असतं. जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पोटॅशिअमचं यात 7.5 टक्के प्रमाण असतं. त्यामुळे याचं सेवन फायदेशीर ठरतं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य