always feeling hungry here are the reason-signs you must know
सतत भूक लागते? चुकूनही ‘या’ संकेतांकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच व्हा सावध, ‘अशी’ घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 11:23 AM1 / 11सामान्यत: अन्न खाल्ल्यानंतर, काही तास भूक लागत नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना पोटभर जेवल्यानंतरही पुन्हा भूक लागते. त्याच वेळी, काही लोक आहेत जे रागाने किंवा दुःखी असताना स्वतःला शांत करण्यासाठी खाणे सुरू करतात. 2 / 11काही जण खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात. जास्त खाण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यामागील कारणं शोधणं अत्यंत आवश्यक आहे. जास्त अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. 3 / 11जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खातात, तेव्हा तुम्हाला सूज येणे, छातीत जळजळ आणि पचनाशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागते. जाणून घेऊया जास्त भूक लागण्यामागची नेमकी कारणं काय आहेत. 4 / 11जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त भूक लागते. कारण झोपेच्या कमतरतेमुळे तुमची भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. ज्या लोकांना झोप येत नाही, त्यांना खूप भूक लागते आणि जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत नाही.5 / 11शरीरात प्रोटीनची कमतरता असतानाही तुम्हाला नेहमी भूक लागते. प्रोटीन तुमची भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आहारात प्रोटीनचा समावेश केल्याने शरीरात काही हार्मोन्सचं प्रोडक्शन वाढतं जे तुम्हाला पोट भरण्याचे संकेत देतात आणि तुमची भूक नियंत्रित करतात.6 / 11शरीराच्या योग्य कार्यासाठी, आपण जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. तुमच्या हृदयाचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि पाचक आरोग्यासाठी पाणी खूप फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा पाणी पित नाही, तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते.7 / 11मधुमेह असलेल्या लोकांना सामान्य लोकांपेक्षा जास्त भूक लागते. असे घडते कारण रक्तातील ग्लुकोज इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे तुमचे शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागते. 8 / 11मधुमेहाच्या काही लक्षणांमध्ये जास्त तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, अंधुक दृष्टी, थकवा आणि पाय आणि हातांना मुंग्या येणे यांचा समावेश आहे. मधुमेह असणाऱ्यांनी आरोग्याची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. 9 / 11जास्त भूक लागण्यामागे प्रेग्नेंसीहे आणखी एक कारण आहे. तुमचे शरीर असे करते जेणेकरून तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आणि योग्य अंतराने खाणे महत्त्वाचे आहे.10 / 11भूक नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात काही बदल करता येतात जेणेकरून आपली प्रकृती ही उत्तम राहील आणि निरोगी आयुष्य जगता येईल. यासाठी अंडी, दही इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.11 / 11जास्त मीठ आणि गोड पदार्थांचे सेवन टाळा. स्वतःला हायड्रेटेड ठेवा. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस देखील घेऊ शकता. अल्कोहोलचा वापर कमीत कमी करा. दारू प्यायल्यानंतर तुमची भूक वाढते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications