शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचा का दिला जातो सल्ला? फायदे वाचून रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 11:19 AM

1 / 8
खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. त्यासोबतच यात कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही भरपूर असतं. हिवाळ्यात जर तुम्ही रोज याचं सेवन केलं तर काय काय फायदे मिळतील तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 8
ओलं खोबरं खाऊन केवळ शरीरालाच नाही तर मेंदुला देखील अनेक फायदे मिळतात. यात आयर्न आणि व्हिटॅमिन बी६ आढळतं जे मेंदुची काम करण्याची क्षमता वाढवतं. तसेच स्मरणशक्तीही वाढते.
3 / 8
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, ओल्या खोबऱ्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचा त्यांचा आहारात समावेश करावा.
4 / 8
ओल्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्ससोबतच अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. जे त्वचा आणि केसांना भरपूर पोषण देतात. यात आढळणारं व्हिटॅमिन ई त्वचा उजळवतं. तसेच याच्या सेवनाने केसांचा रखरखीतपणा दूर होते.
5 / 8
हिवाळ्यात नियमितपणे ओलं खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. खोबऱ्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.
6 / 8
जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.
7 / 8
उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.
8 / 8
खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य