कॅन्सरसारख्या अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात फणसाच्या बिया; जाणून घ्या फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:23 PM
1 / 6 फणसाचे गरे खायला सर्वांनाच आवडतं. मात्र फणसाच्या बियांची भाजी (आठळ्या) ही अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहेत. त्वचेशी संबंधीत विविध आजार, मानसिक तणाव, केस गळणे, कॅन्सर यासारख्या अनेक आजारांवर ही भाजी गुणकारी ठरत आहे. फणसाच्या बियांचे फायदे जाणून घ्या. 2 / 6 अनेकांच्या शरिरात रक्ताची कमतरता असते. फणसाच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. शरिरातील हिमोग्लोबीनची कमतरता ते दूर करतात. त्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी ही भाजी खाणं गरजेचं आहे. 3 / 6 फणसाच्या बियांमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असतात. यामुळे शरिराला एनर्जी मिळते. तेसच बियांमध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोजचे प्रमाणही अधिक असते ज्याच्यामुळे शरिराला ऊर्जा मिळते. 4 / 6 फणसाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण हे अधिक असते. ज्याच्यामुळे पचनशक्ती वाढते. त्यामुळे आहारात फणसाच्या भाजीचा वापर करा. 5 / 6 कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फणसाच्या बिया उपयुक्त ठरतात. फणसाच्या बियांमध्ये अॅन्टीऑक्सीडेंट्सचे प्रमाण अधिक असते. तसेच इम्युनिटी सिस्टम मजबूत करून रोगांपासून बचाव करतात. 6 / 6 श्वसनासंबंधी आजार असल्यास फणसाच्या बियांची भाजी खा. अलर्जी, अस्थमा यासारख्या तक्रारी दूर करण्यासाठी फणसाच्या बियांची भाजी उपयुक्त ठरते. आणखी वाचा