Amazing health benefits of consuming sweet potatoes daily
'या' गंभीर समस्या दूर करायच्या असतील तर नियमित करा रताळ्यांचं सेवन! By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 9:38 AM1 / 9रताळ्यांना स्वीट पोटॅटोही म्हटलं जातं. ही एक कंदमुळं असलेली भाजी आहे. याची साल ब्राऊन, जांबळी किंवा पांढऱ्या रंगाची असते. तर याची टेस्ट गोड आणि स्टार्ची असते. यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, ज्यामुळे आरोग्यासाठी हे फार फायदेशीर मानलं जातं.2 / 9रताळ्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि बी6 सोबतच पोटॅशिअम आणि मॅगनीजही भरपूर प्रमाणात असतं. त्याशिवाय यात अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यास मदत करतात. रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स नॉर्मल बटाट्याच्या तुलनेत फार कमी असतो आणि ज्यामुळे याने ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. अशात डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे फार चांगलं मानलं जातं. चला जाणून घेऊ रताळ्याचे काही फायदे...3 / 9हाडांसाठी फायदेशीर - रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. हे व्हिटॅमिन दात, हाडे, त्वचा आणि नसांची ग्रोथ व मजबूतीसाठी आवश्यक असतं. 4 / 9आयरन भरपूर - रताळ्यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं. आयरनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात एनर्जी राहत नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि ब्लड सेल्सची निर्मितीही योग्यपणे होत नाही. रताळ्यातून तुम्हाला भरपूर आयरन मिळतं.5 / 9ब्लड शुगर कमी होईल - रताळ्यात कॅरोटीनॉयड नावाचं तत्व आढळतं जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतं. तेच यातील व्हिटॅमिन बी6 डायबिटीक हार्ट डिजीजमध्येही फायदेशीर असतं. 6 / 9किडनीसाठी फायदेशीर - रताळ्यांमध्ये पोटॅशिअमही भरपूर असतं. हे नर्वस सिस्टीमची सक्रियता योग्यपणे कायम ठेवण्यास आवश्यक आहे. सोबतच हे किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासही फायदेशीर आहे. 7 / 9इंफ्लेमेशन करा कमी - रताळ्यामध्ये अॅंटी-इफ्लेमेटरी गुण आढळतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात. जी हार्ट डिजीज, कॅन्सर आणि सांधीवातासंबंधी असते.8 / 9वजन कमी करा - रताळं फार पौष्टिक असतं आणि हे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. यात फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. ज्यामुळे हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं.9 / 9इम्यूनिटी करा बूस्ट - रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे हे इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. याने शरीराला इन्फेक्शन आणि आजारांपासून लढण्याची मदत मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications