Amazing health benefits of fasting you should know
उपवास तर अनेकदा करत असाल, आता त्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:34 AM1 / 11श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि दिवसाच्या शेवटी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. महाशिवरात्री, आषाढी एकादशी अशा अनेक महत्वांच्या दिवशी उपवास ठेवले जातात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो.जाणून घेऊ उपवास करण्याचे काही फायदे.2 / 11भूक वाढते - तुम्ही जर दिवसभरात तीन-चार वेळा अन्न ग्रहण करीत असाल तर तुम्हाला खरी भुक म्हणजे काय हे माहिती नसेल. कधीतरी 12 ते 24 तास उपवास करुन बघा. त्यानंतर भुक म्हणजे काय असते ते समजेल. याने तुमचे हार्मोन्स रेग्युलेट होतात. शरीरासाठी हे चांगले आहे.3 / 11आहार पद्धत सुधारते - बिंग इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास केल्यास फायदा होतो. बऱ्याचदा कामाचे तास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळे खाण्याची पद्धती विस्कळित झालेली असते. उपवासाने ती सुधारते. त्यामुळे अनेक रोग तुमच्यापासून दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.4 / 11वजन कमी होतं - उपवास केल्याने शरीराचा जाडपणा कमी होतो. जेवणाच्या पद्धतीत बदल करुन फास्टिंग केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.5 / 11इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते - उपवास केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.6 / 11मेटाबॉलिझमची गती वाढते - उपवास केल्याने पचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटाबॉलिझमला कॅलरीज बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फूड मेटाबॉलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटाबॉलिझमची कार्यक्षमता वाढते.7 / 11लॉंगिटीव्हिटीत वाढ होते - तुम्ही कमी खात असाल तर जास्त काळ जगता हे सत्य आहे. भोजनाची योग्य पद्धत राखली तर लोकांची जीवनमान उंचावतं आणि वाढतं हे काही संस्कृतींमध्ये सिद्ध झाले आहे. मेटाबॉलिझम कमकुवत झाल्याने वयोमान वाढते. तुम्ही म्हातारे दिसू आणि वागू लागता. त्यामुळे शरीर तरुण ठेवण्यासाठी उपवास करायलाच हवा.8 / 11मेंदूची गती वाढते - उपवास केल्याने ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर (BDNF) नावाचे प्रोटिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटिनने मेंदुची गती वाढते. कार्य चांगल्या पद्धतीने पार पडते9 / 11इम्यून सिस्टीम सुधारतं - कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबवणे, फ्रि रॅडिकल डॅमेज कमी करणे, शरीरातील इन्फ्लेमेटरी कंडीशन नियंत्रित करणे आदी कार्ये उपवासातून साध्य केली जाऊ शकतात. जर एखादा प्राणी आजारी पडला तर तो आराम करण्याऐवजी आधी खाणे बंद करतो. कारण शरीरातून त्याला इंटर्नल सिस्टिमवरील ताण कमी करण्याचे अंतर्गत संकेत मिळतात. त्यामुळे शरीर एखाद्या इन्फेक्शनला जोमाने लढा देऊ शकते.10 / 11शारीरिक क्षमता वाढते - वाचन, मेडिटेशन, योगा, मार्शल आर्ट आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. शरीरातील पचन व्यवस्थेत अन्न कमी असेल तर शरीरात जास्त एनर्जी राहू शकते. त्याने काम करण्याची ऊर्जा वाढते. मन संतुलित राहते. नवनवीन कल्पना मनात जन्म घेतात. उत्साह वाढतो.11 / 11 त्वचा चांगली राहते - उपवास केल्याने पाचनक्षमतेला आराम मिळतो. अशा वेळी शरीराला इतर क्रियांकडे लक्ष देण्यासाठी पुरेशी वेळ मिळते. त्यामुळे स्कीन चांगली राहणे, केस मजबूत होणे आदी कामे या काळात पार पाडली जातात. शिवाय शरीरातील अनावश्यक घटक यावेळी बाहेर टाकले जातात. शरीर शुद्ध होते. आणखी वाचा Subscribe to Notifications