शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्या लगेच होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 12:59 PM

1 / 8
जास्तीत जास्त लोक हे मीठ केवळ खाण्यातच वापरतात, पण मीठ जर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील. यात आढळणाऱ्या मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅड्रफही होणार नाही. केस आणखी मजबूत आणि चमकदार होता. चला जाणून घेऊ आणखी काही फायदे...
2 / 8
केसांसाठी फायदेशीर - मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. केसांमधील किटाणून नष्ट होण्यासोबतच याने डॅंड्रफही दूर होतात. केसांना नवी चमक मिळते.
3 / 8
त्वचेसाठी फायदा - मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. रोज या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. तसेच याने रंग उजळण्यासही मदत होईल.
4 / 8
संक्रमणापासून बचाव - मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियमसारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो. कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फार उपयोगी आहे. मिठात असलेले मिनरल्स अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरील पोर्स म्हणजे रोमछिद्र मोकळे होतात आणि याने शरीराला इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
5 / 8
चांगली झोप - ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. म्हणजे ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्यांच्यासाठी हा उपाय बेस्ट आहे. कारण मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याल थकवा आणि तणाव दूर होता. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते.
6 / 8
हाडांना आणि मांसपेशींना आराम - मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. तसेच याने ऑस्टियोऑर्थरायटिस आणि टेंडीनीटिससारख्या समस्याही दूर होतात.
7 / 8
पिंपल्सपासन सुटका - पिंपल्स दूर करण्यासाठीही मिठाच्या पाण्याचा फायदा होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर पोर्स ओपन होतात आणि ज्यानंतर त्वचेवरील मळ बाहेर निघतो. याप्रकारे बॉडी डिटॉक्स झाल्यावर त्वचेवरील डाग आणि पिंपल्स दूर होतात.
8 / 8
तणाव कमी होतो - जर तुम्हाला फार जास्त तणाव असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ केली पाहिजे. याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. मिठाच्या पाण्यात असलेले मिनरल्स शरीरात मुरतात आणि याने फायदा मिळतो. मानलं जातं की, सोडिअमचा प्रभाव मेंदूवर होतो. बॉडी डिटॉक्स झाल्यावर शरीराचं स्ट्रेस दूर होतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य