शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 2:19 PM

1 / 11
Covishield लसीच्या दुर्मिळ दुष्परिणामांबद्दलची चर्चा अजून संपलेली नसताना आता आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. AstraZeneca च्या Covishield मध्ये नवीन धोकादायक ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर आढळला आहे.
2 / 11
एका रिसर्चमध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स य़ुनिव्हर्सिची आणि इतर काही इंटरनॅशनल रिसर्चरने आपल्या लेटेस्ट रिसर्चमध्ये हा दावा केला आहे.
3 / 11
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने बनवलेल्या ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca च्या Covid-19 लसीमध्ये इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया आणि थ्रोम्बोसिसचा धोका नुकताच आढळून आला आहे. या गंभीर आजारात रक्ताची गुठळी तयार होते.
4 / 11
या लसीच्या दुष्परिणामांवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीने जगभरातून आपली लस परत मागवण्याचा निर्णय घेतला. एडिनोव्हायरस वेक्टर-आधारित ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका लसीमुळे VITT हा एक नवीन रोग म्हणून उदयास आला आहे. प्लेटलेट फॅक्टर 4 (PF 4) साठी घातक रक्त ऑटोअँटीबॉडीज VITT कारणीभूत असल्याचं आढळलं आहे.
5 / 11
2023 मध्ये वेगळ्या रिसर्चमध्ये, कॅनडा, उत्तर अमेरिका, जर्मनी आणि इटलीमधील शास्त्रज्ञांना PF4 अँटीबॉडीसह एक नवीन रोग आढळला, जो काही प्रकरणांमध्ये नैसर्गिकरित्या एडेनोव्हायरस म्हणजेच सामान्य सर्दी संसर्गानंतर धोकादायक होता.
6 / 11
नवीन रिसर्चमध्ये, ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटी आणि जगभरातील इतर तज्ञांना असे आढळून आले की एडेनोव्हायरस संसर्गाशी संबंधित VITT आणि क्लासिक एडेनोव्हायरल वेक्टर VITT या दोघांमध्ये PF4 अँटीबॉडी समान मॉलिक्यूलर आहे.
7 / 11
फ्लिंडर्सचे प्रोफेसर टॉम गॉर्डन म्हणाले की, या डिसऑर्डरमध्ये धोकादायक अँटीबॉडी तयार करण्याची पद्धत सारखीच आहे. आमचे उपाय VITT संसर्गानंतर रक्त गोठण्याच्या दुर्मिळ प्रकरणांसाठी लागू आहेत.
8 / 11
2022 मध्ये एका रिसर्चमध्ये, संशोधकांच्या टीमने PF4 अँटीबॉडीचा मॉलिक्यूलर शोधून अनुवांशिक धोका ओळखला होता. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन निकालांमध्ये लसीच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
9 / 11
फेब्रुवारीमध्ये ब्रिटिश उच्च न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर दस्तऐवजात एस्ट्राझेनेकाने ते स्वीकारल्यानंतर हा रिसर्च समोर आला आहे. कंपनीच्या कोविड लसीमुळे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसाइटोपेनिक सिंड्रोम (TTS) होऊ शकतो.
10 / 11
ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ शकते. ब्रिटनमध्येही यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सायन्स जर्नल स्प्रिंगरलिंकमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे देखील दुष्परिणाम आहेत.
11 / 11
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) मध्ये केलेल्या अभ्यासात समाविष्ट असलेल्या सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये श्वसन संक्रमण, रक्त गोठणे आणि त्वचा रोग दिसून आले. संशोधकांना आढळले की टीनएजर्सना कोवॅक्सिनचा धोका जास्त असतो. यापैकी बहुतेक जण एलर्जीने ग्रस्त आहेत.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य