शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 4:13 PM

1 / 8
सध्या स्मार्टफोनचा काळ आहे. हल्ली लहान मुलांच्या हातात सुद्धा स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे मुलांच्या मैदानी खेळाकडील कल कमी होताना दिसून येत आहे. टाईमपाससाठी ते फोनचा वापर करत असून तासनतास गेम किंवा इतर कोणत्याही कामात मग्न असतात. मात्र, आता त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे.
2 / 8
सध्या स्मार्टफोनचा काळ आहे. हल्ली लहान मुलांच्या हातात सुद्धा स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे मुलांच्या मैदानी खेळाकडील कल कमी होताना दिसून येत आहे. टाईमपाससाठी ते फोनचा वापर करत असून तासनतास गेम किंवा इतर कोणत्याही कामात मग्न असतात. मात्र, आता त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे.
3 / 8
स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. लहान मुलेही ऑटिझमसारख्या धोकादायक आजाराला बळी पडत आहेत. डॉक्टरांच्या मते, फोनच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होत आहे. याला व्हर्च्युअल ऑटिझम (आभासी आत्मकेंद्रीपणा) म्हणतात.
4 / 8
पाच ते आठ वर्षांच्या मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. व्हर्च्युअल ऑटिझममुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील २४ टक्के मुले रात्री झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरतात. या कारणास्तव, जवळपास ४० टक्के मुले काही कामात लक्ष केंद्रित करण्याच्या समस्येशी झुंजत आहेत.
5 / 8
दिल्लीतील न्यूरोसर्जन डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, जर मुलाला व्हर्च्युअल ऑटिझमचा त्रास होत असेल, तर ते बोलताना भीतभीत होतात किवा तोतरे बोलतात. या मुलांमध्ये बुद्ध्यांक पातळीही कमी असते. ते कोणाशीही बोलायला घाबरतात. कोणत्याही कामाला योग्य प्रतिसाद न देणे आणि तेच काम पुन्हा पुन्हा करणे.
6 / 8
सध्या ऑटिझमच्या केसेस येत आहेत. त्यापैकी ५ ते १० टक्के अशी मुले आहेत, जी स्मार्टफोनचा अधिक वापर करतात. फोनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये व्हर्च्युअल ऑटिझम होत असल्याचे हे द्योतक आहे. काही मुलांना फोन बघूनच जेवण खाण्याची सवय असते. हे देखील खूप हानिकारक आहे.
7 / 8
फोन पाहताना मुलांना नीट जेवता येत नाही. फोनच्या अतिवापरामुळे त्याला अभ्यासातही अडचणी येत आहेत. दोन ते तीन वर्षे वयाच्या काही मुलांमध्येही फोन पाहण्याची क्रेझ दिसून येत आहे. हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
8 / 8
1) मुलांमध्ये फोन वापरण्याची वेळ कमी करा. 2) मुलांना वेळ द्या आणि खेळासाठी प्रोत्साहन द्या. 3) मुलांना फोनचे तोटे सांगा. 4) दररोज मुलांशी बोलणे सुनिश्चित करा.
टॅग्स :Healthआरोग्यSmartphoneस्मार्टफोनJara hatkeजरा हटके