शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, पोटात गॅस आणि Acidity ने व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:00 PM

1 / 9
रात्रीची झोप पूर्ण होणं फार गरजेचं असतं. असं मानलं जातं की, जर रात्री तुम्ही 7 ते 8 तासांची झोप घेत नसाल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. एनसीबीआयनुसार, पुरेशी झोप न घेतल्याने आणि झोपेसंबंधी समस्यांमुळे व्यक्ती हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, लठ्ठपणा, तणाव, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका राहतो.
2 / 9
अनेक लोकांना रात्री जागण्याची आणि सकाळी झोपण्याची सवय असते. जास्तीत जास्त लोक याचं कारण रात्री झोप न येणं सांगतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, तुम्हाला रात्री झोप न येण्याचं कारण तुमच्या डिनरमध्ये असू शकतं. असे अनेक पदार्थ असतात जे रात्री खाल्ल्याने तुम्हाला झोप येणार नाही. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ जे तुमची झोप उडवतात आणि अनेक समस्या निर्माण करतात.
3 / 9
राजमा - यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार, राजमामध्ये आयरन, कॉपर, फोलेट, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. त्यासोबतच यात फायबरही असतं. जे पचनक्रिया मजबूत करण्यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर करतं. इतके फायदे असूनही राजमा रात्री खाऊ नये. कारण यातील काही तत्वांमुळे पोटात गॅस तयार होतो.
4 / 9
ब्रोकली - ब्रोकली आरोग्यासाठी फार फायदेशी असते. पण ही डिनरमध्ये खाण्याची चूक करू नका. ​ब्रोकलीमधील फायबर पचन्यासाठी जास्त वेळ घेतं आणि ज्यामुळे रात्रीची झोप पुरेशी होत नाही. सकाळी गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही होऊ शकते.
5 / 9
टोमॅटो - टोमॅटो खाल्ल्याने झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. हे मुख्यपणे टायरामाइनमुळे होतं. हे एक प्रकारच अमीनो अॅसिड आहे. जो आपल्या मेंदूची हालचाल वाढवतं आणि झोपेला उशीर करतं. त्याशिवाय यातील व्हिटॅमिन सी मुळे पचन बरोबर होत नाही. ज्यामुळे अॅसिडिटी होते.
6 / 9
वांगी - वांग्यामध्येही टोमॅटोसारखं अमीनो अॅसिड असतं ज्यात टायरामाइनचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे नॉरपेनेफ्रिनचं प्रमाण वाढतं. हे एक उत्तेजक आहे जे बॉडीला अॅक्टिव ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे रात्री वांगी खाणं टाळा.
7 / 9
काकडी - काकडीमध्ये 95 टक्के पाणी असतं. याच्या भरपूर सेवनाने तुम्हाला अनेक फायदे होतात. पण रात्री काकडी खाणं तुम्हाला समस्या देऊ शकतं. कारण यामुळे तुमची झोप मोड होऊ शकते. याने तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
8 / 9
फ्लॉवर - फ्लॉवर सामान्यपणे आरोग्यासाठी फार चांगली असते. पण झोपण्याआधी याचं सेवन करू नये. या भाजीमुळे तुमची झोप खराब होऊ शकते. कारण यातील फायबरमुळे तुमची झोपमोड होते. पोटात गॅस तयार होतो.
9 / 9
दही - दह्याचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. पण हे रात्री अजिबात खाऊ नये. दही थंड असतं ते पचायला वेळ लागतं. ज्यामुळे तुम्हाला रात्रभर अस्वस्थता जाणवेल. आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे की, दही रात्री अजिबात खाऊ नये. कारण याने कफची समस्या होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य