शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली दही खाण्याची योग्य वेळ, चूक केली तर आतड्यांमध्ये तयार होईल विष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 1:52 PM

1 / 8
आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळे दह्याची डिमांड वाढणं सुरू झाली आहे. उन्हाळ्यात जेवणासोबत दही खाणं, थंड लस्सी पिणं, दह्या वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळी मजा असते. पण इतर गोष्टींसारखंच दही खाण्याचं टायमिंग, प्रमाण, क्वालिटी आणि कॉम्बिनेशन यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. दही खाताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर तसं केलं नाही तर फायद्याऐवजी नुकसान होतं.
2 / 8
आयुर्वेदात दह्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, दही टेस्टला आंबट, गरम, पचनाला जड असतं. दह्यामुळे चरबी वाढते, शरीराला मजबुती मिळते, कफ आणि पित्तही वाढतं. तसेच अग्नीमध्येही सुधारणा होते. पण दही खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
3 / 8
दही गरम करू नका - तसे तर कुणीही दह्याला गरम करत नाही. पण काही पदार्थ दह्याच्या मिश्रणाने तयार होतात. जर तुम्ही दह्याच्या मिश्रणाने तयार पदार्थ गरम केले तर हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. डॉक्टरांनुसार, दही गरम केलं तर त्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात.
4 / 8
कुणी करू नये दह्याचं सेवन - लठ्ठपणा, कफ, रक्तस्राव किंवा सूज अशा समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. अशात दह्याचं सेवन केलं तर समस्या आणखी वाढू शकते.
5 / 8
रात्री दही खाणं टाळा - डॉक्टरांनी सांगितलं की, रात्रीच्या वेळी दह्याचं सेवन कधीच करू नये. याने कफ होण्याची समस्या आणखी वाढते. तसेच दह्याचं सेवन रोज करू नये. रोज केवळ छासचं सेवन केलं जाऊ शकतं. ज्यात काळं मीठ, काळे मिरे आणि जिरं असेल.
6 / 8
फळांसोबत दही खाऊ नये - दही फळांसोबत कधीच खाऊ नये. याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. फळांसोबत दह्याचं सेवन नियमित केलं तर पचनासंबंधी समस्या आणि अॅलर्जी वाढू शकते.
7 / 8
मांस-मासे-दही एकत्र कधीच खाऊ नये - दही कधीच मांस आणि मास्यांसोबत कधीच खाऊ नये. चिकन, मटन किंवा मासे खात असाल आणि त्यासोबत दह्याचं सेवन करत असाल तर याने शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात.
8 / 8
दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत - डॉक्टर सांगतात की, बरेच लोक कशाचाही विचार न करता आणि जास्त प्रमाणात दही खातात. खासकरून रात्री दही खातात. त्यामुळे जर तुम्हाला दही खायचं असेल तर दुपारी आणि कमी प्रमाणात खावं. जर दही खात नसाल तर छास सगळ्यात चांगला पर्याय आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य