शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्या एक वर्षात बाळांना झोप न येण्याची समस्या पडू शकते महागात, कशी ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:00 AM

1 / 11
नवजात बाळांना झोपण्याची किती समस्या होते हे तुमच्या घरात बाळ असेल तुम्हाला माहीत असेलच. वयाच्या १ वर्षांपर्यंत त्यांची फारच काळजी घ्यावी. पण अनेक बाळांना झोपण्याची समस्या असते. म्हणजे त्यांना फार झोपच येत नाही. ही बाब अजिबात सामान्य नाही.
2 / 11
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या लहान मुलांना पहिल्या १ वर्षात व्यवस्थित झोप येत नसेल तर त्यांना बालपणात चिंता आणि डिप्रेशनची समस्या होऊ शकते. (Image Credit : cnn.com)
3 / 11
पाचपैकी एका बाळाला पहिल्या १२ महिन्यात झोपण्यासंबंधी अडचणी येतात. त्यांना एकतर झोपेतून लगेच उठण्याची किंवा झोपच न येण्याची समस्या असते. (Image Credit : freepressjournal.in)
4 / 11
अशाप्रकारच्या बाळांना भावनात्मक समस्यांचा सामना तिप्पट करावा लागतो. रिसर्चनुसार, ही समस्या त्यांच्यात वयाच्या चौथ्या वर्षी अधिक बघायला मिळते. (Image Credit : DailyMail)
5 / 11
त्यांना इमोशनल डिसऑर्डर जसे की, डिप्रेशन, separation anxiety किंवा सतत विचारात राहण्याची समस्या वयाच्या १०व्या वर्षात होऊ शकते. (Image Credit : abcnews.go.com)
6 / 11
Murdoch Children’s Research Institute in Melbourne, Australia मधील वैज्ञानिकांनी सांगितले की, ज्या बाळांना झोपण्यासंबंधी समस्या असते त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून त्यांना बालपणातच मानसिक समस्यांचा सामना करावा लागू नये.
7 / 11
या सर्व बाळांना तीन गटांमध्ये विभागण्यात आलं होतं. यातील १९ टक्के बाळांना नियमित झोप न येण्याची समस्या होती. तर यातीलच काहींना रोत्री झोपेतून सतत उठण्याची आणि पालकांशिवाय झोप न येण्याची समस्या होती. (Image Credit : drweil.com)
8 / 11
तर ५६ टक्के बाळांना गाढ झोप न लागण्याची समस्या होती. तर केवळ २५ टक्के बाळांनाच चांगली झोप येत होती. नंतर या सर्वांवर पुढेही लक्ष ठेवण्यात आलं. तेव्हा त्यांचं चौथ्या आणि दहाव्या वयात मानसिक आरोग्य ठिक नसल्याचं आढळून आलं. (Image Credit : babysleepsite.com)
9 / 11
हा रिसर्च BMJ Archives of Disease in Childhood journal मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. (Image Credit : whdh.com)
10 / 11
रिसर्चनुसार, झोपण्यासंबंधी समस्या असलेल्या बाळांना १०व्या वयापर्यंत separation anxiety, obsessive compulsive disorder, depression, bipolar आणि ADHD समस्यांचा सामना करावा लागला. (Image Credit : psycom.net)
11 / 11
दरम्यान, पहिल्या १ वर्षात लहान मुलांच्या झोपेकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला या रिसर्चमधून देण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना बालपणात डिप्रेशनसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागू नये.
टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स