Bad Causes habits to cause kidney failure myb
किडनी खराब व्हायला 'या' सवयी ठरतात कारणीभूत, वाचाल तरच वाचाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 12:16 PM1 / 10सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीरातील अनेक अवयव डॅमेज होतात. नकळतपणे वाढत्या वयात किडनी, हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. 2 / 10किडनी हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. कारण हृदयाला रक्तप्रवाह होण्याआधी किडनीमधून फिल्टर केलं जातं. किडनी मुत्राच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्सना बाहेर टाकते. 3 / 10शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडले नाही तर नुकसान होऊ शकतं. त्यासाठी तुमच्या वाईट सवयी कारणीभूत ठरत असातात. या सवयी तुम्ही आजच्या आजचं बदलायला हव्यात.4 / 10 पेनकिलर घेतल्यानंतर तुम्हाला शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळत असला तरी संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळे किडनीवर परिणाम होऊन रक्तप्रवाह असुरळित होऊ शकतो. 5 / 10 जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते. किडनी स्टोनसारख्या समस्या निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर रोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.6 / 10मदयाचं अतिसेवन केल्याने शरीरातील विषारी घटक वाढून किडनीवर परिणाम होतो. क्रोनिक किडनी डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे किडनीवर नकारात्मक परिणाम होत असतो.7 / 10जास्तवेळ बसून राहिल्यामुळे मुत्राशयाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. किडनी तसंच मानेच्या आणि पाठीच्या कोणत्याही प्रकारच्या आजारापासून वाचण्यासाठी सतत बसून राहू नका. काम करतानामध्ये गॅप घ्या. 8 / 10जास्त मीठ आणि साखरेचं सेवन केल्याने सुद्धा रक्तदाब वाढतो. शरीरात सोडीयमचं प्रमाण अधिक झाल्याने किडनीच्या समस्या उद्भवतात. 9 / 10आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगल्या झोपेची आवश्यकता असते. जर तुमची झोप चांगली झाली नाही शारीरिक संतुलन बिघडून कोणतीही समस्या उद्भवू शकते.10 / 10आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगल्या झोपेची आवश्यकता असते. जर तुमची झोप चांगली झाली नाही शारीरिक संतुलन बिघडून कोणतीही समस्या उद्भवू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications