Bat antibody will help in making coronavirus vaccine leading scientist says myb
ज्याच्यामुळे जीव गेले, तोच आता जीव वाचवणार? वटवाघळांवर संशोधन सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 6:40 PM1 / 10कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या महामारीतून लोकांना वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, वटवाघळामुळे कोरोना व्हायरस पसरला. पण वटवाघळामुळेच कोरोना व्हायरसवर उपचार केले जाऊ शकतात.2 / 10जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसवर संशोधन केले आहे. लोकांसाठी घातक ठरत असलेल्या वटवाघळांना अशा गुहांमध्ये शोधण्यात आलं जिथे त्यांच्या संपूर्ण प्रजाती अस्तित्वात होत्या. या गुहेतून वटवाघळांचं रक्त, लाळ, जाळे असे नमुने एकत्र करण्यात आले होते.3 / 10पीटर डेसजॅक या शास्त्रज्ञांने वटवाघळांबाबत हा दावा केला आहे. पीटर इको हेल्थ एलायंस नावाच्या एका संस्थेत कार्यरत आहे. ही संस्था व्हायरसच्या संशोधनात तसंच व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांची मदत करते.4 / 10पीटर डेसजॅक यांनी १० ते २० देशातील धोकादायक व्हायरचा शोध घेतला आहे. पीटर यांनी दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी कोणता व्हायरस माणसांसाठी घातक ठरू शकतो. यांचे संशोधन करण्यात येतं.5 / 10पीटर डेसजॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार वाटवाघळांच्या रक्तात कोरोना आणि इतर व्हायरसशी लढणारे एंटीबॉडी मिळाले आहेत. या एंटीबॉडी वटवाघळांना कोरोनाप्रमाणे इतर व्हायरसची लढण्यासाठी मदत करतात. या एंटीबॉडींचा वापर करून कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लस तयार करता येऊ शकते. 6 / 10वटवाघळं येऊ नयेत म्हणून केनियातील लोकांना आपली घरं पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त वटवाघळंच नाही इतर अनेक प्राण्यांमुळे व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. म्हणून प्राण्यापासून लांब राहून साफसफाई ठेवणं गरजेचं आहे.7 / 10२००९ मध्ये अमेरिकेने प्रेडिक्ट मिशनची स्थापना केली. यात इको हेल्थ एलायंस, द स्मिथ सोनियम इंस्टि्ट्यूट,वाईल्ड लाईफ कंजर्वेजशन सोसायटी आणि कॅलिर्फोनियाची एक कंपनी मिळून महामारी ट्रॅकर तयार करण्यात आले. याचा उद्देश मोठ्या महामारीवर नियंत्रण मिळवता यावं असा होता. 8 / 10कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर तपासणीदरम्यान दिसून आलं की, या प्रकारचे डीएनए वुहान इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अनेक वर्षापासून आहेत. हे नमुने यूनान प्रदेशातील बंद गुहांमधल्या वटवाघळांमधून घेण्यात आले होते.9 / 10कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर तपासणीदरम्यान दिसून आलं की, या प्रकारचे डीएनए वुहान इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अनेक वर्षापासून आहेत. हे नमुने यूनान प्रदेशातील बंद गुहांमधल्या वटवाघळांमधून घेण्यात आले होते.10 / 10कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर तपासणीदरम्यान दिसून आलं की, या प्रकारचे डीएनए वुहान इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अनेक वर्षापासून आहेत. हे नमुने यूनान प्रदेशातील बंद गुहांमधल्या वटवाघळांमधून घेण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications