Bath Tips: Remember these rules before taking bath water for better health!
Bath Tips: उत्तम आरोग्यासाठी आंघोळीचे पाणी अंगावर घेण्याआधी लक्षात ठेवा 'हे' नियम! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 7:00 AM1 / 6आंघोळीची पद्धत चुकीची असेल तर केस गळणे, केसात कोंडा होणे, डोळ्याखाली काळी वर्तुळ तयार होणे, पचनक्रिया मंदावणे, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणे इ. समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र योग्य प्रकारे अंघोळ केली असता केवळ शरीर स्वच्छ होत नाही तर मनही शांत होते. त्यासाठी पुढील उपाय... 2 / 6आयुर्वेद सांगते कोमट पाण्याने अंघोळ करा. शरीरासाठी गार आणि गरम पाणी योग्य नाही, म्हणून सर्व ऋतूंमध्ये कोमट पाण्याने अंघोळ करावी. तरीदेखील सवयीनुसार थंड पाण्याने अंघोळ करणार असाल तर डोक्यापासून पायाकडे पाणी घ्यावे आणि कोमट पाण्याने अंघोळ करणार असाल तर पायापासून पाणी घेत डोक्यापर्यंत न्यावे. अंगावर पाणी घेण्याची दिशा योग्य असेल तर रक्तभिसरण सुरळीत होते आणि रक्ताच्या गाठीदेखील बनत नाहीत. 3 / 6रोज कडक गरम पाण्याने अंघोळ केल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. मेंदू आणि डोळ्यांवर ताण पडू शकतो. म्हणून सर्दी पडसे असले तरी कोमट पाण्याने अंघोळ करणे जास्त सोयीस्कर ठरते. 4 / 6सकाळी उठल्यावर तासाभरात आंघोळ करणे सर्वार्थाने योग्य ठरते. त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा पचन क्रियेसाठी वापरली जाते. रक्ताभिसरण पोटाच्या दिशेने होते. याउलट तुम्ही जेवणानंतर आंघोळ करत असाल तर शरीराचे तपमान कमी होते आणि पचनक्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तरीही ज्यांना जेवण झाल्यावर आंघोळ करायला आवडते त्यांनी किमान दोन तासाचा अवधी मध्ये ठेवावा. 5 / 6शरीरात चांगले रक्ताभिसरण व्हावे म्हणून आंघोळीआधी एखाद्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. त्यामुळे स्नायू मोकळे होतात, शरीराचा मळ तेलाला चिकटतो. वरून कोमट पाण्याने आंघोळ केली असता शरीर स्वच्छ होऊन रंध्र मोकळी होतील. यालाच अभ्यंग स्नान म्हणतात. जर रोज तुम्हाला हे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान २-३ वेळा ही कृती जरूर करा. 6 / 6आपण फक्त दिवाळीत उटणे लावून अभ्यंग स्नान करतो, पण आयुर्वेद सांगते की आठवड्यातून एकदा तरी तांदळाचे पीठ किंवा बेसन, हळद, दूध किंवा पाणी घालून तो लेप अंगाला लावावा. त्यामुळे स्वच्छ अंघोळ होते आणि त्वचा मऊ राहते. जर तुम्ही हे सर्व नियम पाळून अंघोळ केलीत तर तुम्हाला अनेक फायदे होतील हे नक्की! आणखी वाचा Subscribe to Notifications