शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान ! तुम्हीदेखील रात्री लाइट सुरू ठेऊन झोपता? मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 6:41 PM

1 / 6
रात्री उशिरापर्यंत जागरण करणं किंवा लाइट सुरू ठेऊन झोपण्याची सवय असेल तर ती लवकरच बदलण्याची आवश्यकता आहे. या सवयीपासून तुम्हाला सांभाळून राहावं लागेल.
2 / 6
कारण रात्री झोपताना दिव्याच्या संपर्कात आल्यानं कित्येक आजारांनी तुम्ही ग्रासले जाऊ शकता, अशी माहिती ब्रिटनमधील एका युनिर्व्हसिटीनं केलेल्या संशोधनाद्वारे समोर आली आहे.
3 / 6
संशोधनानुसार, रात्रीच्या वेळेस आपल्या शरीराला उजेडाची आवश्यकता नसते. त्यामुळे लाइट सुरू ठेवून झोपणे ही सवय शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.
4 / 6
दिवसा सूर्याद्वारे मिळणारा प्रकाश इतका फायदेशीर ठरतो की, याचा डोळ्यांवर कोणत्याही प्रकाराचा विपरित परिणाम होत नाही. आपले शरीररुपी जैविक घड्याळ हे सूर्य आणि चंद्राच्या उजाडामुळे नियंत्रणात असते.
5 / 6
रात्रीच्या वेळेस लाइट सुरू ठेऊन झोपण्याच्या सवयीमुळे कर्करोग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. झोपी जाण्याची ठिकाणी जर उजेड असेल तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका 22 टक्क्यांनी वाढतो. पण अंधारात झोपणाऱ्या महिलांना अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही, ही माहिती 10 वर्षे करण्यात आलेल्या अभ्यासाद्वारे मांडण्यात आली आहे.
6 / 6
रात्रीच्या वेळेस कम्प्युटरवर काम करणं किंवा अंधारात वाचन करणं, यामुळे डोळ्यांवर बराच ताण पडतो आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. रात्री बल्ब किंवा मानव निर्मित उपकरणांद्वारे मिळणाऱ्या प्रकाशाचा आपल्या मनस्थितीवरही मोठ्या प्रमाणात ताण पडतो. यामुळे हृदयालाही हानी पोहोचण्याची शक्यता असते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स