Be careful! Street food is dangerous for your health
सावधान ! रस्त्यावरचं खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:45 PM1 / 5रस्त्यावरील खाणे स्वादिष्ट वाटत असलं तर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असते. सुशिक्षितवर्ग देखील हेच रस्त्यावर खाणे चवीने खातो याचे विशेष वाटते.उघडयावरच्या खाद्यपदार्थामुळे कावीळ, टायफॉईड, कॉलरा, अतिसार अशा विविध आजारांना आमंत्रण मिळते. 2 / 5रस्त्यावर अर्धे कच्चे खाद्यपदार्थ खासकरून मासांहारी पदार्थ ठेवले जातात.गिऱ्हाईक आल्यावर गरम करून दिले जातात.अशा खाद्यपदार्थामध्ये विषाणूंची वाढ झपाटयाने होते. असे अर्धवट शिजलेले खाद्यपदार्थ पोटात गेल्यास अनेक तक्रारी सुरू होतात. 3 / 5रस्त्यावरील खाण्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असत. मिठाचं सेवन अधिक प्रमाणात केल्याने हायपरटेंशनच धोका उद्भवतो. चायनीज पदार्थातला अजिनोमोटो आणि मशरूममुळे अनेकांना ऍलर्जी होते. चायनीज, वडापाव, समोसे, बर्गर, पिझ्झा या सर्व फास्ट फुडच्या अतिसेवनाने शरीरात चरबी वाढते. 4 / 5रस्त्यावरच्या टपर्यांवरही चायनीज, पिझ्झा, बर्गर, पास्ता, खाल्ल्याने लठ्ठपणाचे प्रमाण अधिक वाढते..लठ्ठपणामुळे वयाच्या विशीतल्या लाखो जणांना अतिरक्तदाब, मधुमेह यासह अनेक विकारांनी ग्रस्त झाल्याचे दिसून येते.5 / 5अमेरिकेच्या फूड आणि अँग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगभरातील 250 करोड पेक्षा अधिक लोक रस्त्यावरचं खाणे पसंत करतात. कारण रस्त्यावरील खाण्याचे पदार्थ स्वस्त आणि लवकर मिळतात. खाद्यपदार्थ विक्रेत्याकडील पाणी पिणे तसेच खाद्यपदार्थ खाणे याबाबत नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी आणखी वाचा Subscribe to Notifications