be careful what you eat in this summer
सावधान! उन्हाळ्यात हे ५ पदार्थ खाणे पडेल महागात By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 5:51 PM1 / 6उन्हाळ्यात बाहेरील हवामान उष्ण असल्याने आपल्या शरीरात थंडावा राखण्याची गरज असते. म्हणून थंड शीतपेय किंवा पदार्थाचं आपण हमखास सेवन करतो. पण अशाच काही पदार्थांपासून किंवा पेयांपासून तुम्हाला त्रासही होऊ शकतो. सर्दी, खोकला, डोकेदुखी व पोटाचे विकारही होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात कोणताही पदार्थ खाताना किंवा पिताना नक्की काळजी घ्या. 2 / 6१) कोल्ड्रिंक्स व इतर थंड पेय - उन्हाळ्यात तहान मोठ्या प्रमाणावर लागते. कोल्ड्रिक्समध्ये सोड्याचं व सारखेचं प्रमाण अधिक असल्याने तहान वाढते व शरीराला त्रासही होतो. म्हणून कोल्ड्रिंक्सचं सेवन टाळा.3 / 6२) रस्त्यावरील पदार्थ - उन्हाळ्यात फूड पॉयझनिंग होण्याचं प्रमाण जास्त असतं. उघड्यावरील अन्नपदार्थ उष्णतेत बराच वेळ असतात असे पदार्थ खाल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.4 / 6३) पिझ्झा, बर्गर आणि पास्ता - आजकाल आपण जंकफूड कधीही खातो. पिझ्झा, बर्गर आणि पास्तामुळे तुम्हाला अपचनाची समस्या उद्भवू शकते. म्हणून असे पदार्थ खाण्याआधी विचार करा. 5 / 6४) चायनिज पदार्थ - चायनिज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सॉसचा वापर केलेला असतो. हे सॉस आपल्या शरीरासाठी घातक असतातच, पण उन्हाळ्यात या सॉसमुळे तुम्हाला डोकेदु:खी किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. 6 / 6५) तिखट पदार्थ - उन्हाळ्यात तुमच्या शरीराचं तापमान उष्ण असतं, त्यातून जर तुम्ही तिखट पदार्थांचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढतं व भूकही लागत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications